लॉंच होण्याआधीच SUV Harrier माहिती उघड, पाहा फिचर्स आणि किंमत

 ही ऑन रोड किंमत असल्याने यामध्ये नोंदणी खर्च, विमा आणि इतर करही आहेत.

Updated: Dec 6, 2018, 10:50 AM IST
लॉंच होण्याआधीच SUV Harrier माहिती उघड, पाहा फिचर्स आणि किंमत  title=

मुंबई : टाटा मोटर्स आपल्या ग्राहकांची पसंद लक्षात घेऊन एसयूव्ही हॅरियर (SUV Harrier) बाजारात आणत आहे. नवी टाटा Harrier  ही नव्या OMEGARC प्लॅटफॉर्मचाच एक हिस्सा आहे. लॅंड रोव्हरच्या डी 8 आर्किटेक्चरवर हे आधारीत आहे. येत्या जानेवारीला ही कार लॉंच होणार असून ग्राहकांना खरेदी  करता येणार आहे. कंपनीने केलेल्या ट्वीटनुसार एसयूव्हीची  बेस वेरिएंट (XE) ऑन रोड किंमत 16 लाख रुपये आणि टॉप वेरिएंट (XZ) ची किंमत 21 लाख रुपये असेल. ही ऑन रोड किंमत असल्याने यामध्ये नोंदणी खर्च, विमा आणि इतर करही आहेत.

पाच रंगात उपलब्ध 

टाटा मोटर्सने नव्या SUV वेरिएंट्सबद्दलही माहिती दिलीय. नव्या SUV चे चार व्हेरिएंट असून ती XE, XM, XT आणि XZ मध्ये उपलब्ध होईल. या नव्या कारमध्ये ग्राहकांना निवडण्यासाठी पाच रंग आहेत.  कैलिस्टो कॉपर, एरियल सिल्वर, थर्मिस्टो गोल्ड, ऑर्कस वाइट आणि टेलेस्टो ग्रे या रंगांमध्ये कार उपलब्ध आहे.

टॉप व्हेरिएंट्सचे फिचर्स

- Xenon HID प्रोजेक्टर हेडलॅम्प्स

- फ्रंट फॉग लैम्प आणि कॉर्नरिंग लाइट्स

- शार्क फिन अॅंटीना

- 7.0-इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट कल्स्टर

- 8.8-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम

- एम्पलीफायर सोबत 9JBL स्पीकर्स

- 60:40 स्प्लिट फोल्डिंग सीट्स

- टेरेन रिस्पॉन्स मोड: नॉर्मल, वेट अॅण्ड रफ

- 6 एअरबॅग्ज

- ESP

- ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स

- हिल होल्ड

- रोल-ओवर मिटिगेशन

- कॉर्नरिंग स्टेबिलिटी कंट्रोल

- ट्रैक्शन कंट्रोल

- हाइड्रॉलिक ब्रेक असिस्ट

मॅकेनिकल बाबींचा विचार केला तर SUV मध्ये 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड ‘Kryotec' डीझेल इंजिन असेल. जे  138bhp ची पॉवर आणि 350Nm चे पिक टॉर्क जेनरेट करेल. या इंजिनसोबत मॅन्युयल गिअरबॉक्सचा ऑप्शन देखील मिळणार आहे. इथे अॅंटोमेटीकचे ऑप्शन मिळणार नाही.