Tata Nexon Red Dark Edition: टाटा मोटर्सने (Tata Motors) देशात नेक्सॉन (Nexon), हॅरियर (Harrier) आणि सफारी एसयुव्हीचं (Safari SUVs) रेड डार्क एडिशन लॉन्च केलं आहे. नव्या नेक्सॉन रेड डार्क एडिशनची किंमत 12.35 लाख रुपयांपासून सुरुवात होत आहे. नव्या रेड एडिशन नेक्सॉनची लाइनअप सध्या उपलब्ध असलेल्या डार्क एडिशनवरच आधारित आहे. यापैकी केवळ नेक्सॉनची किंमत जाहीर करण्यात आली आहे. इतर गाड्यांची किंमत लवकरच जाहीर केली जाणार आहे.
टाटा नेक्सॉन रेड डार्क एडिशनचे दोन व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले आहेत. यापैकी पहिलं व्हेरिएंट पेट्रोल आणि दुसरं डीझेल मॉडेल आहे. यापैकी पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 12.35 लाख रुपये असून डीझेल व्हेरिएंट 13.70 लाख रुपयांना उपलब्ध होणार आहे. नव्या मॉडेलचं फ्रंट ग्रिल आणि ब्रेक कॅलीपर्सवर रेड अॅक्सेंटसहीत ओबेरॉन ब्लॅक एक्सटीरियरमध्ये फिनिशिंग करण्यात आलं आहे. लाल रंगामधील हा बदल गाडीच्या लूकमध्ये प्राकर्षाने दिसत आहे. डार्क बँज फ्रंट फेडरवर फारच छान दिसत आहे. ही गाडी चारकोल ब्लॅक पेंट स्कीममध्ये असून गाडीला 16 इंचांचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
नेक्सॉन रेड डार्क एडिशनमध्ये केबिन ग्रॅब हॅण्डल, सेंटर कंन्सोल, स्टेअरिंग व्हील आणि लेदरेट सीट्सवर कार्नेलियन रेड रंग देण्यात आला आहे. काळ्या आणि लाल रंगाची आकर्षक रचना इंटिरियरमध्येही दिसून येते. सीटच्या हेडरेस्टवर डार्क बॅज दिसून येतो. फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर कॅम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस फोन चार्जिंग, इलेक्ट्रीक सनरुफ, एअर प्युरिफायरबरोबरच 7 इंचांचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट टॅब देण्यात आला आहे.
नव्या नेक्सॉन रेड डार्क एडिशन दोन इंजिनाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यापैकी पहिला पर्याय 1.2 लीटर 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल आणि दुसरा पर्याय 1.5 लीटर 4 सिलेंडर टर्बो डीझेलचा आहे. पेट्रोल इंजिन 120 पीएस आणि 170 एनएम टॉर्क निर्माण करतं. टर्बो डीझेल 110 पीएस आणि 260 एनएम टॉर्क निर्माण करणाऱ्या क्षमतेचं इंजिन आहे. यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल किंवा 6 स्पीड एमएमटी गेअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. नवं डार्क एडिशन 3 वर्ष किंवा 1 लाख किमी यापैकी जे आधी लागू होतील त्या वॉरंटीसहीत उपलब्ध आहे.