नवी दिल्ली : रिलायन्स जिओने स्वस्त डेडा आणि कॉलिंगचा प्लॅन सादर केल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्राईझ व्हार सुरु झाले आहे. गेल्या काही दिवसात एअरटेल आणि आयडिया कंपनीने ग्राहकांसाठी स्वस्त प्लॅनची घोषणा केली होती. त्यानंतर एअरटेल आणि वोडाफोन कंपन्यांनी मोबाईल निर्माता कंपनीसोबत मिळून स्वस्त ४जी प्लॅन सादर केले. आता वोडाफोनने अजून एक स्वस्त प्लॅन युजर्ससाठी सादर केला आहे. हा प्लॅन १८१ आणि १९५ रुपयांत उपलब्ध आहे.
हा आहे प्लॅन :
वोडाफोनने सादर केलेल्या प्लॅनमध्ये १८१ रुपयांत अनलिमिटेड डेटा मिळत आहे. मात्र हा डेटा ४जी नसून २जी असेल. याव्यतिरिक्त या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग ची सुविधा देखील मिळत आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. त्याचबरोबर १९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्संना दररोज २जी, ३जी आणि ४जी नेटवर्कसाठी १ जीबी डेटा मिळेल.
१९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कतर्फे दररोज २५० मिनिट आणि आठवड्यातून १००० मिनिटे कॉलिंग ची सुविधा मिळत आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी देखील २८ दिवसांची आहे. दिवाळी सीजनमध्ये वोडाफोनने ३९९ रुपयांचा प्लॅन सादर केला होता. या प्लॅन देखील ग्राहकांच्या चांगलाच पसंतीस उतरला.
वोडाफोनच्या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ६ महिन्यांसाठी ९०जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा मिळत आहे. यापूर्वी कंपनीने ३९९ रुपयांचा ८४ दिवसांसाठी असणारा प्लॅन सादर केला होता. यात ८४ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा होती. मात्र ही ऑफर काही निवडक युजर्ससाठी होती.