जर तुम्ही देखील अँड्रॉइड फोनद्वारे बँकिंग वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. देशाच्या फेडरल सायबर सिक्युरिटी एजन्सीने एका ताज्या अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, भारतीय सायबर स्पेसमध्ये बँकिंग ट्रोजन मालवेअर सापडले आहे जे अँड्रॉइड फोन वापरून बँक ग्राहकांच्या बँक खात्यावर डल्ला मारण्यासाठी डिझाइन केलेले आहे. त्याने आधीच 27 पेक्षा जास्त सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांना लक्ष्य केले आहे.
इंडियन कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) ने मंगळवारी जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, फिशिंग मालवेअर 'इन्कम टॅक्स रिफंड' म्हणून मास्करेड करत आहे आणि ग्राहकांच्या डेटाची गोपनीयता प्रभावीपणे धोक्यात आणत आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर हल्ले होऊ शकतात आणि आर्थिक फसवणूक देखील होऊ शकते.
गाईडलाईन्समध्ये असे म्हटले आहे की भारतीय बँकिंग ग्राहकांना Drinik Android मालवेअर वापरून नवीन प्रकारच्या मोबाइल बँकिंग मोहिमेद्वारे लक्ष्य केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. Drinik ने 2016 मध्ये SMS चोरी करणारा म्हणून सुरुवात केली आणि अलीकडेच बँकिंग ट्रोजन मध्ये विकसित झाला आहे. जे फिशिंग स्क्रीन प्रदर्शित करते आणि वापरकर्त्यांना संवेदनशील बँकिंग माहिती प्रविष्ट करण्यास प्रवृत्त करते.
सीईआरटी-इनने म्हटले आहे की, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील 27 पेक्षा जास्त भारतीय बँकांच्या ग्राहकांना आधीच हल्लेखोरांनी लक्ष्य केले आहे. सायबर हल्ल्यांचा सामना करण्यासाठी आणि फिशिंग आणि हॅकिंग हल्ले आणि तत्सम ऑनलाइन हल्ल्यांपासून सायबर स्पेसचे संरक्षण करण्यासाठी सीईआरटी-इन ही फेडरल तंत्रज्ञान शाखा आहे.