307KM range Electric Bike: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता ग्राहकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळवला आहे. भारतात गेल्या काही महिन्यात जबरदस्त इलेक्ट्रिक बाइक लाँच केल्या आहेत. यात आणखी एका गाडीची भर पडणार आहे. अल्ट्रावॉयलेट ऑटोमेटिव्ह 24 नोव्हेंबरला आपली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाइक Ultraviolette F77 लाँच करणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने ही बाइक सादर केली होती. ही बाइक तयार करण्याासाठी कंपनीने 5 वर्षे रिसर्च केलं आहे. इलेक्ट्रिक बाइक जबरदस्त लूकसह फुल चार्जमध्ये 300 किमी अंतर कापेल, असा दावा कंपनीने केला आहे. मागील महिन्यापासून या गाडीची बुकिंग सुरु झाली आहे. फक्त 10 हजार रुपये भरून गाडी बुक करू शकता.
अल्ट्रावॉयलेट ऑटोमेटिव कंपनीने दावा केला आहे की, जवळपासस 190 देशात 70 हजाराहून अधिक गाड्यांची ऑर्डर मिळाली आहे. अजून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही गाडी तीन व्हेरियंटमध्ये येणार आहे. एअरस्ट्राइक, लेजर आणि शॅडो या तीन रंगात असणार आहे. तीन व्हेरियंटसह या बाइकमध्ये वेगवेगळं स्पेसिफिकेशन आणि परफॉर्मेंस असणार आहे.
It's official! #ultraviolette #F77 #launch pic.twitter.com/m7Mu6uYBG6
— Ultraviolette (@UltravioletteEV) October 15, 2022
बातमी वाचा- YouTube कधी होती डेटिंग साइट! नोकियासह या कंपन्यांनी केली अशी सुरुवात जाणून घ्या
बाइकसोबत विविध अॅक्सेसरीजही देण्यात येणार आहेत. यात पोर्टेबल फास्ट चार्जर, स्टँडर्ड चार्जर, व्हील कॅप, होम चार्जिंग पॉड, क्रॅश गार्ड, पॅनियर आणि व्हिझर असेल. अल्ट्राव्हायोलेट F77 ड्युअल-चॅनल ABS, अॅडजस्टेबल सस्पेंशन, मल्टिपल ड्राइव्ह मोड्स आणि रीजनरेटिव्ह ब्रेकिंग यांसारख्या फीचर्ससह येईल. एक टीएफटी स्क्रीन असेल आणि रायडरला विविध माहिती दाखवेल.