नवी दिल्ली : तुम्ही जर्मन कार कंपनीची फॉक्सवॅगन (Volkswagen)परफॉर्मन्स हॅचबॅक कार पोलो जीटीआय (Polo GTI) खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे.
फॉक्सवॅगन पोलो जीटीआयची किंमत ६ लाख रुपयांनी कमी केली आहे. ज्या वेळी लॉन्च झाली त्यावेळी या गाडीची किंमत २५.९९ लाख होती. ही दिल्लीतील एक्स शोरूम किंमत होती. आता त्याची किंमत १९.९९ लाख झाली आहे.
एनडीटीव्ही ऑटोने दिलेल्या बातमीनुसार फॉक्सवॅगनच्या प्रवक्त्याने सांगितले की नवी किंमत १ जुलैपासून लागू झालेल्या गुड्स अॅड सर्व्हिस टॅक्स (GST)प्रमाणे आहे. पहिल्या भागात कंपनीने भारतात पहिल्या लॉटमध्ये केवळ ९९ पोलो जीटीआय लॉन्च केली आहे. ही नवी कार दुसऱ्या कारपेक्षा वेगळी आहे. यात १.८ लीटरचे इंजिन देण्यात आले आहे. कंपनीने गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये भारतीय बाजारात उतरवली होती.
पहिल्या फेजमध्ये ९९ युनीटची विक्रीसाठी
पहिल्या फेजमध्ये केवळ या कारचे ९९ युनिटची विक्री करण्यात आली. पोलो जीईटी मॉडेलमध्ये ४ सिलेंडरचे १.८ लीटरचे TSI इंजिन आहे. फॉक्सवॅगनचे हे दमदार इंजिन 189 bhpची पॉवर आहे. तर २५० न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतो. याचा टर्बोचार्ज्ड इंजिनसह सात स्पीडचा ऑटोमॅटिक गिअर बॉक्स आहे.
सर्व ९९ युनिटची विक्री झाली आहे. तर काही कार डिलर्सकडे आहे. कंपनी आता दुसऱ्या लॉटवर काम करत आहे.