Google Takeout म्हणजे काय रे भाऊ? याचा वापर कसा कराल? जाणून घ्या सर्वकाही

Google Takeout: पैसे देखील वाचावेत म्हणून काहीजण डाटा ट्रॉन्सफर करत होते. मात्र, त्यावर गुगलने भन्नाट उपाय शोधून काढलाय. त्याचं नाव Google Takeout

Updated: Feb 24, 2023, 09:25 PM IST
Google Takeout म्हणजे काय रे भाऊ? याचा वापर कसा कराल? जाणून घ्या सर्वकाही title=
Google Takeout

Google Takeout: गुगल हे सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन (Search Engine) आहे. गुगल कंपनी अनेक भन्नाट इस्टर एग्स किंवा गुप्त संज्ञा शोधत असते. अशातच गुगल फोटोज (Google Photos) मध्ये आता अनलिमिटेड डेटा (Unlimited Data) अपलोड करण्याची सुविधा कंपनीने आणली होती. कंपनी 15 जीबीपेक्षा जास्त डाटा असल्यास पैसे घेत होती. हे पैसे देखील वाचावेत म्हणून काहीजण डाटा ट्रॉन्सफर करत होते. मात्र, त्यावर गुगलने भन्नाट उपाय शोधून काढलाय. त्याचं नाव Google Takeout.

Google Takeout म्हणजे काय?

Google Takeout ही एक अशी सेवा आहे जी तुम्हाला तुमच्या Google खात्यामधील एकाधिक अॅप्समधून डेटा निवडण्याची आणि निवडण्याची अनुमती देते. यामध्ये तुम्ही गुगल ड्राईव्हच्या फाइल्स, कॉन्टॅक्ट्स, यूट्यूब व्हिडीओ आणि मुख्य म्हणजे 'गुगल फोटोज' मधून तुमचे सर्व फोटो डाऊनलोड आणि सेव्ह करू शकता. त्यामुळे त्याचा फायदा वापरकर्त्यांना होतोय.

Google Takeout चा वापर कसा कराल?

तुम्हाला तुमचे गुगल अकाउंट लॉग इन करावे लागेल. यानंतर तुम्हाला takeout.google.com वर लॉग इन करावं लागेल. डिसिलेक्ट ऑल क्लिक करा. पाहिजे तो फोटो निवडा. तुम्हाला वर्षातून दोन महिन्यांनी एकदा एक्सपोर्ट  करण्यासाठी मुदत दिली जाईल.

आणखी वाचा - तुम्हाला वाटेल स्क्रीनला काय झालं? पण थांबा, Google ने कमाल केलीये...

दरम्यान, zip फाइल्स किंवा tgz फाइल्समधून फोटोसाठी एक फॉरमॅट निवडावा लागेल. 'Create Export' वर क्लिक करा. त्यानंतर ओळखीची प्रक्रिया सुरू होते. तुमच्या खात्यावर मेल पाठवेल.  An archive of Google data has been requested असा मेल येईल. त्यावरून तुम्ही अनुमती देयची आहे. एकदा ते मंजूर झाल्यानंतर, गुगल तुमचा सर्व डेटा तुमच्या खात्यावर पाठवेल. त्यानंतर तुम्हाला जास्त काही करण्याची गरज उरणार नाही आणि तुमचा डाटा सुरक्षित राहिल.