नववर्षात व्हॉट्सएपमध्ये दिसतील हे 6 बदल

सध्या या फिचर्सची टेस्ट सुरु असून लवकरच तुमच्या पर्यंत ते पोहोचतील. 

Updated: Dec 15, 2018, 11:57 AM IST
नववर्षात व्हॉट्सएपमध्ये दिसतील हे 6 बदल title=

मुंबई : डिसेंबर सुरू आहे. ख्रिसमस तोंडावर आलाय. अनेकांचे ईयर एंडचे प्लान देखील बनवून झाले. अनेक कंपन्या ईयर एंड सेल, नव्या वर्षाच्या ऑफर्सच्या जाहीरातीही करु लागल्या आहेत. दरम्यान व्हॉट्सएपही यामध्ये मागे नाहीय. नव वर्षात व्हॉट्सएप आपल्या युजर्ससाठी 6 नवे फिचर्स घेऊन येतंय. सध्या या फिचर्सची टेस्ट सुरु असून लवकरच तुमच्या पर्यंत ते पोहोचतील.

वॉईस मेसेज

आतापर्यंत तुम्ही मेसेज टाईप करतात ते असलेल्या की वर टॅप करुन वॉईस रेकॉर्ड मेसेज पाठवू शकत होतात. एखादी भावना समजण्यासाठी जसा लगेच आपण ईमोजी निवडतो. तसे ऑप्शन वॉईस मेसेजमध्ये देखील येणार आहेत. एक क्लिक आणि व्हॉट्सएप तुम्हाला वॉईस मेसेजचे अनेक पर्याय देईल. हे फिचर व्हॉट्सअप बेटा आयओएस (v 2.18.100) आणि अॅण्ड्रॉईड बेटा वर्जन(v 2.18.362) वर दिसतंय.

क्यू आर कोड 

एखाद्याला नंबर सांगण्यापेक्षा व्हॉट्सअॅपचा क्यू आर कोड एकमेकांशी स्कॅन केल्यावर आपले डिटेल्स शेअर होऊ शकतात. हे युजर्सच्या सेफ्टीसाठी देखील चांगले आहे. क्यू आर कोड काही व्हॉट्सअॅपसाठी नवा नाही. क्यू आर कोडने डेस्कटॉपवर लॉग इन करताना प्रत्येक वेळी स्कॅन कराव लागतो. 

डार्क मोड 

डार्क मोड मध्ये युजर्सच्या डोळ्यांची काळजी घेण्यात आली आहे. दिवसात जास्त प्रकाशामुळे मोबाईल स्क्रिन वरचा प्रकाश कमी दिसतो. अशावेळी ब्राईटनेस वाढवावा लागतो. पण रात्री जास्त ब्राईटनेसचा आपल्या डोळ्यांना त्रास होऊ लागतो. मग पु्न्हा ब्राइटनेस कमी करावा लागतो. स्ट्रेट फॉर्वर्ड मोडने आपल्या सर्वकाही वेळेप्रमाणे बदललेल दिसेल. यामुळे डोळ्यांनाही त्रास होणार नाही.

ग्रुप कॉल शॉर्टकट

ग्रुप व्हिडीओ आणि ऑडिओ कॉल व्हॉट्सअपने नुकतंच आणलंय. ग्रुप व्हिडिओ कॉल केल्यावर सर्वजणांना कॉल जातो आणि उजव्या साईटवरील ऑप्शन क्लिक करुन आपण कॉल उचलू शकत होतो. ज्यांना बोलायच नसेल त्यांनाही हा कॉल जात असे. पण आता तसं होणार नाही. आपण ग्रुपमधील ठराविक जणांना व्हिडीओ आणि ऑडिओ कॉल करु शकतो.

मीडिया प्रिव्ह्यू 

एखादा व्हिडीओ, फोटो किंवा ऑडीओ आला असेल तर त्याला खाली स्वाईप करुन नंतरही पाहू शकतो. यासाठी प्रत्येकवेळी एप ओपन करायची गरज लागणार नाही. ही सुविधा केवळ आयओएस डिव्हाइस युजर्सना मिळतेय.

पिक्चर इन पिक्चर 

जेव्हा तुम्ही एखादी युट्यूब लिंक समोरच्याला पाठवली तर त्याच्या मोबाईलची सिस्टिम लगेच त्याला युट्यूबवर घेऊन जाईल आणि व्हिडीओ ओपन होईल.

मोबाईल स्क्रिनवर तुम्हाला तो युट्यूब व्हिडीओ प्ले झालेला दिसेल. एकाच वेळी तुम्ही चॅट देखील करु शकता. यासाठी तुम्हाला वेगवेगळे टॅप करण्याची गरज नाही.