मुंबई : एका महिलेने नवऱ्याकडे व्यक्त केलेली इच्छा इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या महिलेचं या माणसाशी ३ वर्षापूर्वी लग्न झालं आहे. मात्र या महिलेने नवऱ्याला असं सांगितलं की, आपल्याला जे मूल होईल, ते स्पर्म डोनरकडूनच व्हायला हवं. स्पर्म डोनरकडून का मूल व्हायला हवं?, याचं कारण जेव्हा या महिलेने दिलं, तेव्हा त्याचं कारण, नवऱ्यालाचं नाही, तर जगाला धक्का देणारं होतं.
या महिलेला स्पर्म डोनरकडूनच मूल हवं होतं कारण, तिचा नवरा दिसायला तेवढा चांगला नव्हता, असं तिला वाटतं. ही सत्य घटना या महिलेच्या नवऱ्याने, सोशल मीडिया साईट 'रेडीट'वर शेअर केली आहे. ही स्टोरी प्रचंड व्हायरल होत आहे.
या जोडप्याने जेव्हा मूल जन्माला घालायचं ठरवलं, तेव्हा या महिलेने आपल्या पतीला स्पर्म डोनर ( म्हणजेच स्पर्म डोनरचे शुक्राणू घेऊन) मूल जन्माला घालू या, असं सांगितलं. तिच्या नवऱ्याकडे मूल जन्माला घालण्याची क्षमता असतानाही, स्पर्म डोनरचा उपदव्याप कशासाठी असा प्रश्न नवऱ्याने केल्यानंतर, तिने यावर जे उत्तर दिलं ते धक्कादायक आहे.
या महिलेने आपल्या नवऱ्याला सांगितलं, माझा मुलगा स्मार्ट स्पर्म डोनरसारखा दिसेल, त्यामुळे त्याचं आयुष्य 'स्मार्ट' आणि 'आनंदी' होईल.
या महिलेने याआधीच एक स्पर्म डोनर शोधून काढला आहे, आणि यात ती एक पाऊल पुढे गेली असल्याचं तिच्या नवऱ्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे. तसेच माझी पत्नीदेखील दिसण्यात एवढी काही सुंदर नाही, पण तरी देखील तिला स्मार्ट-सुंदर मुलाची अपेक्षा आहे, त्याच्या नवीन पोस्टमध्ये आपण पत्नीला सोडचिठ्ठी देण्याची कायदेशीर तयारी करत असल्याचंही नमूद केलं आहे.