Dombivli Water Problem: डोंबिवली जवळील खोणी गावात अंतर्गत राजकराणामुळे पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायत सदस्यांनी विष प्रश्न करण्याची परवानगी मागितली आहे. खोणी ग्रामपंचायत हद्दीतील वडवली परिसरात नागरिकंना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे संतापलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी खोणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे लेखी पत्र लिहून विष प्रश्न करण्याची परवानगी मागितली आहे (Dombivli Water Problem).
कल्याण ग्रामीण भागातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून खोणी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. मात्र, ग्रामपंचायत मधील अंतर्गत राजकीय वादांमुळे सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावात जलवाहिन्या टाकून झालेल्या आहे. प्रत्यक्षात त्यामधून पाणी नाही तर फक्त हवा येत असल्याने महिला देखील आक्रमक झालेले दिसून आले आहेत. नियमित पाणी बिल भरून देखील निवडक सदस्यांच्या प्रभागात नियमित पाणी आणि इतरांना वेगळा न्याय हा ग्रामपंचायतीकडून दिला जात आहे. त्यामुळे मतदारांना किती वेळा गृहीत धरणार असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला आहे. वारंवार पत्रव्यवहार आणि बैठकांमध्ये देखील पाणी विषय घेऊन सुद्धा त्याकडे कानाडोळा केला जात असल्याने विष प्राशन करण्याची परवानगी मागण्याची आली आहे.
धुळे तालुक्यातील जुन्नर गावामध्ये तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. गावामध्ये पर्यायी जलपुरवठा योजना उपलब्ध आहे. मात्र, त्याला पाणी येत नसल्यानं विहिरीतून पाणी भरावं लागत आहे. एक ते दीड किलोमीटर पायी जाऊन पाणी भरावं लागत आहे.
रायगडच्या महाड शहराला पाणीटंचाईच्या झळा भासत आहे. कोथूरडे धरणातील पाण्याने तळ गाठला. त्यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. तसंच काही भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
एकीकडे दिवा वासीयांना कडक उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईची झळ बसत असतांना दुसरीकडे हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचं समोर आले आहे. दिवा शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या मुख्य पाईपलाईन मधून पाण्याची गळती होत असून दररोज अक्षरशः हजारो लिटर पाणी वाया जातं आहे. दिव्यातील टँकर माफियांमुळेच पाईपलाईन मधून गळती होत असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी दिवा शहर भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे.