मुंबई : लैंगिक संबंध ठेवल्याने अनेक फायदे होतात. तुम्हाला माहितीही नसतील असे हे आश्चर्यकारक फायदे लैंगिक संबंधांमुळे होतात. मात्र तुम्हाला माहितीये का, लैंगिक संबंधांमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
अमेरिकन सेक्सुअल हेल्थ एसोसिएशननुसार, सेक्स हा प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. आणि हे तुमच्या शरीरासाठीही फायदेशीर असतं. तर सायकोलॉजिकल रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, आठवड्यातून एक ते दोन वेळा सेक्स केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
2004 च्या एका संशोधनात असं म्हटलंय की, जे लोक आठवड्यातून एक ते दोन वेळा सेक्स करतात त्यांच्या लाळेमध्ये इम्युनोग्लोबिन (रोग टाळण्यास मदत करणाऱ्या अँटीबॉडी) कमी सेक्स करणाऱ्यांपेक्षा जास्त असतात. मात्र लैंगिक संबंधामुळे वाढणारी इम्युनिटी तुम्हाला आजारांपासून रक्षण देईल असं गरजेचं नाही.
जर्मनीच्या एसेन यूनिवर्सिटी क्लिनिकमधील मेडिकल सायकोलॉजी विभागाकडून करण्यात आलेल्या एका छोट्या अभ्यासानुसार, मास्टरबेट करण्याने काही प्रमाणात तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.