मुंबई : उन्हाळ्याचे दिवसांमध्ये महिलांना डिहाइड्रेशन तसंच इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे अशावेळी महिलांना त्यांच्या शरीरारकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. उन्हाळ्यातील सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे घाम येणं. घामामुळे सर्वात जास्त परिणाम तुमच्या इंटिमेट एरियावर होतो.
उन्हाळ्याच्या दिवसांत personal hygiene बाबत बेजबाबदार राहिल्यास महिलांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे आज जाणून घेऊया तज्ज्ञांनी उन्हाळ्याच्या दिवसांत योनीमार्गाची काळजी कशी घ्यावी.
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं असतं. पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून पीएच पातळी नियंत्रित करतं. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे योनिमार्गात जळजळ होऊ शकते.
योनी निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी, दिवसातून किमान दोनदा कोमट पाण्याने धुवा. रात्री झोपण्यापूर्वी हा अवयव स्वच्छ करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला अधिक घाम येत असेल तर तुम्हाला योनी स्वच्छ करणं आवश्यक आहे.
मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. उन्हाळ्यात 4 तासांपेक्षा जास्त एक सॅनिटरी नॅपकिन्स वापरू नका. यामुळे एंटिमेट एरियामध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक वाढतो.