मुंबई : नारळाचा समावेश असलेले मॉइश्चरायझर त्वचेसाठी अधिक चांगले असते. त्यामुळे त्वचा नैसर्गिकरीत्या मृदू आणि तरुण बनते. हा तजेला दिवसभर टिकतो.
त्वचेची निगा राखण्यासाठी दररोज काही प्राथमिक गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. त्यात मॉइश्चरायझरचा सामावेश करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्वचेला पोषण मिळतं आणि ती ताजीतवानीही होते.
पपईचा गर आणि मध समप्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण बनवा आणि त्याने ओल्या चेहऱ्याला १५ मिनिटे मसाज करावा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.
भरडलेले ओट्स, मध, साखरेचे दाणे एकत्र करून ते मिश्रण पाच ते दहा मिनिटे चेहऱ्यावर वर्तुळाकारात चोळावे.
त्वचेला मॉइश्चराइझ करणारा फेस पॅक घरच्या घरी बनवा आणि त्वचा अधिक मऊ बनवा.
त्वचा चमकदार दिसण्यासाठी आठवडय़ातून दोन वेळा एक्झफोलिएटिंग करणे आवश्यक आहे. त्यामुळे मृत आणि निस्तेज त्वचा काढून टाकली जाते. यासाठी घरगुती उपायही करतात.
हात आणि पावलांची विशेष काळजी घ्यावी. कारण त्यांची त्वचा लगेच शुष्क आणि रुक्ष बनते. अशी त्वचा मऊसूत राहण्यासाठी त्यावर दिवसातून दोनदा मॉइश्चरायझर लावावे.