कोलंबो : श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये रविवारी झालेल्या 8 साखळी बॉम्बस्फोटात आतापर्यंत 290 जणांचा मृत्यू झाला आहे तर 500 हून अधिकजण जखमी झाले आहेत. या मृत व्यक्तींमध्ये पाच भारतीय व्यक्तींचा देखील समावेश असून जेडीएसच्या दोन नेत्यांचा देखील यात मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दोन जेडीएस नेत्यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. केजी हनुमंथरयप्पा, एम. रंगप्पा अशी मृत्यू झालेल्या दोन जेडीएसच्या नेत्यांची नावे आहेत.
जेडीएसचे सात नेते २० एप्रिलपासून श्रीलंका दौऱ्यावर होते. स्फोटांनंतर त्यांच्याशी कुठलाही संपर्क झालेला नाही. स्फोटानंतर ५ जेडीएस नेते अजूनही बेपत्ता आहेत.
@SushmaSwaraj
We sadly confirm the deaths of the following two individuals in the blasts yesterday:
- K G Hanumantharayappa
-M Rangappa.— India in Sri Lanka (@IndiainSL) April 22, 2019
कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी दोन नेत्यांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी यावर दु:ख व्यक्त केले आहे. कर्नाटकहून श्रीलंका दौऱ्यावर सात सदस्यांची टीम बॉम्ब हल्ल्यापासून बेपत्ता आहे. यातील दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याचे ते म्हणाले. श्रीलंकेतील भारतीय उच्चायोगाचे ट्टीव परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी रिट्वीट करत यासंदर्भात अधिकृत माहिती दिली. या रिट्वीटमध्ये एम रंगप्पा आणि केजी हनुमंथरैयप्पा यांची नावे आहेत.