दोहा : कतारने ८० देशातील नागरिकांना फ्री व्हिसा एन्ट्री जाहीर केली आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. हवाई वाहतूक आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी कतार सरकारने हा निर्णय घेतला आहे. कतारमध्ये भारतासह युरोपातील काही देशांना ही सवलत देण्यात आली आहे. सोबतच लेबनन, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि यूएसमधील नागरिकांना ऑन अरायव्हल टुरिस्ट व्हिसा मिळणार आहे. ३३ देशातील नागरिकांना सहा महिने तर उर्वरित ४७ देशातील नागरिकांना ३० दिवसांपर्यंत कतारमध्ये वास्तव्य करता येईल.
५ जून रोजी कतारवर सौदी अरेबिया, इजिप्त, बेहरन आणि यूएईने बहिष्कार घातला होता. इराणशी जवळीक साधल्याचा आणि दहशतवादाला पाठिंबा दिल्याचा आरोप करत कतारशी वाहतुकीचे संबंध तोडले होते. कतार या निर्णयामुळे अत्यंत मुक्त देश म्हणून गणला जाईल, असा विश्वास कतार टुरिझम ऑथरिटीचे प्रमुख पर्यटन विकास अधिकारी हसन अल इब्राहिम यांनी व्यक्त केला आहे.