मुंबई : रिलेशनशिप (Relationship) एक अशी गोष्ट आहे, ज्यात विश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो... नात्यात विश्वास (Trust) नसेल तर ते नातं जास्त काळ टिकत नाही. पण काही सत्य असे असतात, जे दोघांना देखील माहित नसतात. पण जर का तेच सत्य समोर आलं तर, दोघांना मोठा धक्का बसतो. असंच काही झालं आहे, अमेरिकेतील (America) एका कपलसोबत. रिलेशनशिपला 6 वर्ष झाल्यानंतर दोघांना कळलं ते दोघे बहिन भाऊ आहेत. हे सत्य समोर आल्यानंतर तरुण आणि तरुणीला मोठा धक्का बसला. (6 year to Relationship )
एक मुलगा आणि मुलगी (boyfriend-girlfriend) 6 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते, पण नंतर अचानक आपण बहिन भाऊ असल्याचं सत्य त्यांच्या समोर आलं. हे धक्कादायक सत्य ऐकून दोघांच्या भुवया उंचावल्या. डीएनएनंतर ( DNA) त्यांना कळालं ते दोघे भाऊ बहिन (brother-sister) आहेत. तरुणीने तिचा अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितला आहे.
तरुणीने सोशल मीडियावर (Social Media) लिहिलं, 'माझं वय 30 वर्ष आहे. मी 32 वर्षांच्या व्यक्तीसोबत माझं रिलेशन सुरु आहे. पण मला आता कळालं की मी ज्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे, तोच माझा बायोलॉजिकल भाऊ (biological brother) आहे. आता मला खूप विचित्र वाटत आहे. '
पुढे तरुणी म्हणते, 'मला माझ्या लहानपणी दत्तक (adoption) घेतलं होतं. हे सत्य मला 5-6 वर्षांनंतर कळालं.' त्याचवेळी त्या मुलीच्या प्रियकराने त्यालाही कोणीतरी दत्तक घेतल्याचे सांगितलं. त्यामुळे दोघांमधील नातं घट्ट झालं.
डीएनए चाचणीने तिचं आणि प्रियकराचे खरं नातं उघड झालं. सुरुवातीला तरुणीला प्रचंड आश्चर्य वाटलं. पुढे तरुणीने ही गोष्ट प्रियकराला सांगितली. आता दोघांनी पुन्हा डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.