अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या मुस्लीम देशांनी भारताला दिल्या खास शुभेच्छा

भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे. जगभरातून भारताला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Updated: Aug 15, 2022, 05:14 PM IST
अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या मुस्लीम देशांनी भारताला दिल्या खास शुभेच्छा title=

मुंबई : भारत आज अमृतमहोत्सव साजरा करत आहे. भारताच्या या 75 व्या स्वातंत्र्यदिनी अनेक मुस्लीम देशांनी भारताला खास शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये सौदी अरेबिया, यूएई, इराण, कतार आणि मलेशिया सारख्या अनेक इस्लामिक देशांचा समावेश आहे. भारताला अभिनंदनाचे संदेश पाठवण्यात आले आहेत. सर्वात खास अभिनंदन संदेश इराणचा होता, ज्यामध्ये एक मुलगी भारतीय राष्ट्रगीताची धून वाजवत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहे.

देशात आणि जगात स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक इस्लामिक देशांनी 15 ऑगस्टच्या निमित्ताने अभिनंदनाचे संदेश जारी केले आहेत. सौदी अरेबियाचे राजे सलमान आणि क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी डिप्लोमॅटिक केबल पाठवून भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ अल सौद यांनी अभिनंदनाचा संदेश दिला आणि भारताच्या राष्ट्रपतींच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपपंतप्रधान आणि क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अझीझ यांनी देखील भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सौदी अरेबियाने भारत आणि देशातील जनतेला समृद्धीची कामना व्य़क्त केली.

मालदीवमधील मजलिसचे अध्यक्ष मोहम्मद नाशीद यांनी भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या रात्री दिलेल्या प्रसिद्ध भाषणाचा संदर्भ देत त्यांनी लिहिले की, स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत एक लष्करी आणि आर्थिक जागतिक महासत्ता बनला आहे, ज्याने आपल्या लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तमाम देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

भारताचा मित्र देश इराणने वेगळ्या पद्धतीने भारताचे अभिनंदन केले आहे. इराणने ट्विटरवर जारी केलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना भारतीय राष्ट्रगीताची धून वाजवताना दिसत आहे. भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा असे ट्विटमध्ये लिहिले आहे. लोकशाहीचा आत्मा भारतातील सर्व जनतेला अधिकाधिक प्रगती, समृद्धी आणि आनंदाच्या दिशेने नेतो.