Two Lakh Salary for Job of Girlfriend: सोशल मीडियावर अनेक विचित्र जाहिरातीबाबत चर्चा होत असते. कारण विचित्र अटी शर्ती लक्ष वेधून घेत असतात. तुम्हीही वृत्तपत्रात विवाहाबाबत जाहिराती वाचल्या असतील. अशीच एक जाहिरात सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. थायलंडमधील दोन मुलांनी गर्लफ्रेंडसाठी (Thailand Girlfriend) जाहिरात काढली आहे. जाहिरातीनुसार, या मुलांना गर्लफ्रेंड हवी असून त्यासाठी ते दोन लाख रुपये महिन्याचा पगारही देणार आहेत. थायलंडमधील मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही तरूण चीनमधील (China Youth) आहेत. पण त्यांना थायलंडची गर्लफ्रेंड हवी आहे, असं त्या दोघांच्या मैत्रिणीनं जाहिरातीत स्पष्ट केलं आहे. जाहिरातीत कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील हेही त्यांनी सांगितले आहे. गरज पडल्यास पगाराची रक्कम वाढवली जाईल असंही सांगितलं आहे.
रिपोर्ट्सनुसार, तरुणीने जाहिरातीत लिहिले आहे की, दोन चिनी मित्र गर्लफ्रेंडच्या शोधात आहेत. मैत्रिणीचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे. गर्लफ्रेंडला 2.16 लाख रुपये पगार (2.16 Lakh Salary) मिळेल. दोघेही माझे मित्र असून स्वभावाने चांगले आहेत. जर दोघांना तुमचे काम आवडले तर तुम्हाला आणखी पगार मिळू शकतो. दोन्ही मुलांना फक्त थाई गर्लफ्रेंडची गरज आहे आणि गर्लफ्रेंड बनू इच्छिणाऱ्या मुलींना चिनी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ही जाहिरात पोस्ट करताच सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
KFC Delivery: महिलेने Online Food केलं ऑर्डर, पण पार्सल खोलताच डोळे फिरले
नुकतीच सोशल मीडियावर अशीच एक जाहिरात समोर आली होती. यात मुलीसाठी वर बघत असल्याचे सांगण्यात आले होते. कुटुंबाला आयएएस/आयपीएस किंवा डॉक्टर किंवा उद्योगपती असा वर हवा आहे. पण जाहिरातीच्या शेवटी लिहिलं होतं की सॉफ्टवेअर इंजिनीअर्सने कृपया फोन करू नका. ही जाहिरातही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.