बीजिंग : चीनच्या कस्टम अधिकाऱ्यांनी फ्रान्सच्या किड्यांवर जोरदार कारवाई केली आहे. कस्टम अधिकाऱ्यांचे म्हणने असे की, फ्रान्सकडून मागविण्यात आलेल्या लाकडांमधून चीनमध्ये किडे येत आहेत. हे किडे चीनमधील झांडाना नुकसान पोहोचवतात.
जियांग्शू अॅण्ट्री-एग्जिट इन्स्पेक्शन अॅण्ड क्वारेटाइन ब्युरो सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, हे किडे लियानयुंगांग प्रांतात आढळले. या प्रांतात फ्रान्समधून विशिष्ट प्रकारचे लाकूड आयात केले होते. या लाकडासोबत अशा पद्धतीचे किडे अधिकाऱ्यांना पहायला मिळाले. एग्रिओटेस पॅलूडम प्रकारातील हे किडे असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.
चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, चीनमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचे किडे पकडण्यात आले आहेत. किड्यांची ही प्रजात शेती आणि वनक्षेत्रासाठी अत्यंत घातक असते. विशेत: या किड्यांपासून लाकडाला मोठे नुकसान पोहोचते.