लंडन : चीननंतर कोरोनाचा फैलाव अमेरिका, रशिया, ब्रिटन, इटली, कॅनडा, फ्रान्स आदी देशांत मोठ्याप्रमाणात झाला आहे. या ठिकाणी कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना मृत्यूचाही आकडा वाढत आहेत. कोरोनाची स्थिती अत्यंत चिंताजनक अशीच आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येत आहे. काही हॉस्टस्पॉट वगळता देशात परिस्थिती नियंत्रणात असून कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.
जगभरात कोरोना विषाणूची आकडेवारी दररोज वेगाने वाढत आहे. ताज्या माहितीनुसार, जगभरात आता कोविड -१९ संसर्गाचे २५, ६१, ९१५ रुग्ण झाले आहेत. १,७७,२०० लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत ६,८१,२१६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या सर्वाधिक बळी पडलेल्या देशांबद्दल सांगायचे झाले तर अमेरिका आणि कॅनडामध्ये आतापर्यंत एकूण ८,४१, ५८४ लोकांना बाधा झाली आहे. यात ४४,९८२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. युरोपमध्येच मृतांचा आकडा १, ०९, ३८१ झाला आहे . तर १२, ३४, ३४० लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
अमेरिकेत कोरोना फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. अमेरिकेतील लॉस अँजेलसमध्ये कारचालकांनी सरकारविरोधात आंदोलन केलं. या कारचालकांनी शहरात रॅली काढली. हॉर्न वाजवत सरकारचा निषेध केला.. स्वातंत्र हा आमचा मुलभूत अधिकार आहे तो कोणीही हिरावू शकत नाही अशा घोषणा दिल्या. लॉकडाऊन रद्द करण्याची मागणी या कारचालकांनी केली आहे.
रशियात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५ हजार २३६ रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे रशियतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५८ हजारांच्याही पुढे गेलीये. आतापर्यत रशियात कोरोनानं ५१३ नागरिकांचा बळी घेतला असून ४ हजार ४२० रुग्ण कोरोनामुक्त झालेत.
गेल्या २४ तासांमध्ये पाकिस्तानात कोरोनामुळे १७रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे पाकिस्तानातील मृतांचा आकडा २१२वर गेलाय.. पाकिस्तानातील कोरोनाग्रस्तांची संख्याही वाढली असून सध्या पाकिस्तानात कोरोनाचे १० हजार ७६रुग्ण आहेत. पाकिस्तानच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.
स्पेनमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाने पुन्हा ४३५ नागरिकांचा बळी घेतलाय. त्यामुळे स्पेनमधील मृतांचा आकडा २१ हजार ७१७वर गेलाय.. आतापर्यंत स्पेनमध्ये ८५हजार ९१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून स्पेनमध्ये अद्यापही कोरोनाचे २ लाख ८ हजार ३८९ रुग्णा आहेत.
भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या हळूहळू वाढू लागलीये. बुधवारी नेपाळमध्ये आणखीन तीन कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत. नव्यानं सापडलेल्या तिनही रुग्णांना तंदी येथील सेनेच्या छावणीत क्वारंटाईन करण्यात आलं होते त्यांचे रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे नेपाळमधील कोरोनाग्रस्तांची संख्या ४५वर गेली आहे. तर आतापर्यंत ७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
शेजार धर्माचं पालन करत भारतानं नेपाळलाही औषधांचा पुरवठा केलाय.. कोरोनाशी लढा देणाऱया नेपाळला भारतानं २३ टन औषधांची पहिली खेप पाठवलीये. भारतानं केलेल्या मदतीबद्दतल नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यांनी पंतप्रधा नरेंद्र मोदींचे आभार मानलेत.. भारताकडू नेपाळमध्ये उपस्थीत असलेल्या राजदूतांनी नेपाळच्या आरोग्य मंत्र्यांकडे ही औषधं सोपवली आहेत.
कॅलिफोर्नीयातील हंटिग्टनं बीचवर लोकांनी सर्फिंगचा आनंद लुटला. लॉस एंजेलिसमधील अनेक बीज लॉकडाऊनमुळे बंद ठेवण्यात आलेले आहेत. मात्र हंटिग्टंन बीच परिसरात मात्र लाटांनवर स्वार होण्यासाठी नागरिक जमल्यालाचं पाहायला मिळत आहे. यावेळी रॉयटर्स या वृत्त संस्थेने ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृष्य टिपले आहे. तर कोरोनाशी लढा देणाऱ्या जर्ममनीतल्या फुटबॉल क्लबने नव्या सामन्यांची तयारी सुरु केल आहे. बायर्न म्युनिक आणि शाल्क क्लब यांनी प्रशिक्षणाला सुरुवातही केलीये. बंद स्टेडियममध्ये सध्या खेळाडूंचा सराव सुरु आहे.
बोलिव्हियातील एल अल्टोस हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स आणि नर्सनं कामबंद आंदोलन सुरु केले आहे. वारंवार मागणी करुनही मृतदेह झाकण्यासाठी प्लास्टीक बॅग्सचा पुरवठा करण्यात येत नाही. त्यामुळे मृतदेह उघड्यावर ठेवावे लागत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.