मुंबई : गेल्या एका वर्षापासून जग कोविड 19 साथीच्या आजारांशी झटत आहे आणि प्रत्येक क्षणी विचार करत आहे की आपण या अडचणीतून कधी मुक्त होणार आणि पुन्हा कधी सामान्य जीवन जगू? आता लसी जरी आली असली तरी ती किती प्रभावी आहे. हे अजून समोर आलेलं आहे. कोरोनामुक्त जगाचे स्वप्न कधी साकार होईल याची तज्ज्ञांनी कल्पना सुरू केली आहे.
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ब्लूमबर्गच्या मते जगात आतापर्यंत 11.90 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. या एजन्सीने जगभरात दिलेल्या लसींचा सर्वात मोठा डेटाबेस तयार केला आहे. या डेटाबेसच्या आधारे, त्यांनी साथीच्या समाप्तीचे मूल्यांकन केले आहे.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला लसी दिली जाते तेव्हा काही आठवड्यांत त्याच्यामध्ये कोरोना विषाणूशी लढण्याचे सामर्थ्य बनते. परंतु जर समाजातील केवळ थोड्या लोकांना ही लस मिळाली असेल तर व्हायरसचा संसर्ग सुरूच राहू शकतो. जितके लोकं लसीकरण करतात तितक्याच लोकांमध्ये विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते. एकत्र लसीकरण झालं तर त्यामुळे सगळ्यांची प्रतिकारशक्ती वाढेल. सध्या रोज लसीकरण होणाऱ्या लोकांची संख्या तुलनेने कमी आहे. त्य़ामुळे कोरोनाचा धोका कायम आहे.
प्रसिद्ध अमेरिकन इम्यूनोलॉजिस्ट डॉ. एंथनी फासी यांच्या मते, जगातील जवळपास 70 ते 85 टक्के लोकं लसीकरण करतात, तेव्हा जगातील प्रत्येक व्यक्तीला कोरोना विषाणूपासून प्रतिकार शक्ती मिळेल. तरच आपण पुन्हा सामान्य जीवनात जाऊ शकू. सध्या जगात दररोज सरासरी 45,40,345 लस दिल्या जात आहेत. या दराने, जगातील 75 टक्के लोकांना लसीकरण करण्यासाठी अंदाजे सात वर्षे जातील.
काही देश लसीकरणाच्या उद्दीष्ट्याकडे वेगाने पुढे जात आहेत. सर्वाधिक लसीकरण दरासह इस्रायल हा देश दोनच महिन्यात 75 टक्के लोकसंख्येस लस देण्याच्या उद्दीष्टाच्या जवळ आहे. अमेरिकेत हे चित्र नवीन वर्षापर्यंत पाहिले जाऊ शकते. श्रीमंत देशांमध्ये लसीकरण दर जास्त आहेत, परंतु उर्वरित जगाला ही लस संगळ्यांना देईपर्यंत सुमारे सात वर्षे लागतील.