एक चूक अन् क्षणात बँक खाते झाले रिकामी, घटनाक्रम वाचून धक्का बसेल

Bank Fraud Case : ही घटना एका 18 वर्षाच्या तरूण मुलीसोबत घडली आहे. तिचे नाव ऑरोरा कैसिली आहे. तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता.  हा मेसेज तिच्या रजिस्टर मोबाईलवरून आल्याने तिला तो बँकेने (Bank) पाठवल्याचे वाटले. या मेसेजमध्ये कोणीतरी तिच्या NAB (नॅशनल ऑस्ट्रेलिया बँक) बँक (Bank) खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लिहिले होते. 

Updated: Jan 8, 2023, 07:34 PM IST
एक चूक अन् क्षणात बँक खाते झाले रिकामी, घटनाक्रम वाचून धक्का बसेल title=

Bank Fraud Case : बॅंका नेहमी ग्राहकांचा फसवणूकीपासून बचाव करण्यासाठी त्यांना सतर्क करत असतात. बँकांसंबंधीत कोणतीही माहिती इतरांना न सांगण्याचे आवाहन करत असतात. मात्र तरीही काही ग्राहक ही चुक करतात आणि फसवणूकीला (Bank Fraud) बळी पडत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणीला एक कॉल येतो (Fraud Call) आणि काही वेळाने तिचे बॅंक खाते रिकामे होते. या घटनेने तिच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता या घटनेत ती बँकेशी सपर्क (Bank) साधून घडलेल्या घटनेची माहिती देत आहे. 

 

हे ही वाचा : 'या' राज्यात आकाशातून होतोय दगडांचा पाऊस, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

 

मोबाईलवर मेसेज आला 

ही घटना एका 18 वर्षाच्या तरूण मुलीसोबत घडली आहे. तिचे नाव ऑरोरा कैसिली आहे. तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता.  हा मेसेज तिच्या रजिस्टर मोबाईलवरून आल्याने तिला तो बँकेने (Bank) पाठवल्याचे वाटले. या मेसेजमध्ये कोणीतरी तिच्या NAB (नॅशनल ऑस्ट्रेलिया बँक) बँक (Bank) खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लिहिले होते. आणि याचा तपास करण्यासाठी 1800 क्रमांकावर कॉल करा असे आवाहन करण्यात आले होते. 

30 लाखांचा गंडा

तरूणी या मेसेजला भूलली आणि तिने लगेचच दिलेल्या 1800 क्रमांकावर कॉल केला. या कॉलमध्ये सायबर चोरट्याने, (Cyber Crime) तिला आर्थिक सुरक्षेसाठी बँकेतील दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर (Money Transfer) करावे लागतील,असे सांगितले. तसेच तिच्याकडून बँक तपशीलही मागितली. कॅसिलीने त्याच्या म्हणण्यानुसार तिला बँकेचे तपशील दिले. आणि सायबर चोराने तिच्या खात्यातील 30 लाख रूपये ही सर्व रक्कम दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करून घेतली.अशाप्रकारे सायबर चोराने तिला गंडा घातला. 

कॉल कट झाला आणि गंडा बसला 

कॅसिलीने पैसे ट्रान्सफर (Money Transfer) झाल्याची पुष्टी केल्यानंतर काही सेकंदांनंतर त्या व्यक्तीने कॉल डिस्कनेक्ट केला. पण तेव्हाच कॅसिलीला कळाले की, त्याने ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले होते ते NAB (नॅशनल ऑस्ट्रेलिया बँक) ऐवजी कॉमनवेल्थ बँकेचे खाते होते. कॅसलीला काहीतरी चुकतंय असं वाटायला लागलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आणि ती सायबर क्राईमची शिकार ठरली होती. 

स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनूसार, कॅसिलीने कॉमनवेल्थ बँकेशी संपर्क साधला होता. परंतु त्या खात्यातून पैसे आधीच काढले गेले होते. तूर्तास, कॅसिलीने आपल्या बँकेकडे मदतीचे आवाहन केले आहे. मात्र आजतागायत तिला तिचे पैसे परत मिळालेले नाहीत. दरम्यान कॅसिलीने सामान्य व्यवहार केला होता, ही तीची चूक होती, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले होते.

दरम्यान दररोज अनेक ग्राहकांची फसवणूक (Bank Fraud) होत असते. त्यामुळे ग्राहकांनी सतर्क रहाणे खुप गरजेचे आहे. ही घटना ऑस्ट्रेलियात घडली आहे.