Imran Khan Gun Attack : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि कर्णधार इमरान खान (Imran Khan) यांच्यावर वजीराबादमध्ये रॅलीमध्ये गोळीबार (Wazirabad Rally Firing) करण्यात आला आहे. या घटनेत इमरान खान यांच्यासोबत 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर एकाचा मृत्यू झालाय. या जीवघेण्या हल्ल्यात इमरान खान यांच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पोलिसांनी गोळीबाराच्या आरोपात एकाला अटक केली आहे. पोलीस त्या व्यक्तीकडून गोळीबार करण्याचा उद्देश नक्की काय होता, तसेच तो कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे का, याबाबत जाणून घेत आहेत. (gunman arrested to who attacked former pm Imran khan haqeeqi march at wazirabad)
इम्रान खान या जीवघेण्या हल्ल्यातून वाचले. या हल्ल्यानंतर माजी पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. "देवाने मला नवं आयुष्य दिलंय. मी पुन्हा पूर्ण ताकदनिशी लढणार", असा निर्धार इम्रान खान यांनी यावेळेस बोलून दाखवला.
दरम्यान या जीवघेण्या हल्ल्यानंतर इम्रान खान यांच्यासाठी संपूर्ण पाकिस्तानातून प्रार्थना करण्यात येत आहे. तसेच या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या घटनेची निंदा केली आहे.