शेर समोर तरस ढेर...; थोडा वेळ काढून सिंह आणि तरसाचा हा Video पाहाच

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Updated: Oct 28, 2022, 07:29 PM IST
शेर समोर तरस ढेर...; थोडा वेळ काढून सिंह आणि तरसाचा हा Video पाहाच title=

Viral video : जंगलांमधील प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतंच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तरस आणि सिंह दिसत असून सिंहाच्या नजरेने तरस कसा बिथरतो हे समजतंय. 

समोर सिंहाला पाहून आपल्यासारख्यांचे नक्कीच धाबे दणाणतील. मात्र याला वन्यजीवांमध्ये भयानक आणि क्रूर शिकारींमध्ये गणला जाणारा तरसही अपवाद ठरत नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तरस आणि सिंहाची अजबच एक केमिस्ट्री पाहायला मिळातेय.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात तर यामध्ये तुम्हाला दोन तसर आणि एक सिंह दिसेल. सिंहाने जंगलात शिकार केल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये शिकारीनंतर सिंह त्याची शिकार खात बसलाय. दरम्यान याच वेळी त्याच्या समोर हे दोन तरस येतायत. यामध्ये एका तरसाची आणि सिंहाची एकमेकांना नजरानजर होते. 

यावेळी सिंह तरसाकडे रागीट नजरेने बघतो. जसं सिंह तरसाकजे पाहतो तसं तरस मागे सरकतो. काही सेकंदांचा असलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांना फारच आवडला आहे.

वाइल्डलाइफ अॅनिमल्स् नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ सोशल मीडियावरून शेअर करण्यात आलाय. तुम्ही एखाद्याला नजरेने मारू शकता, असं कॅप्शन याला देण्यात आलंय. या व्हिडिओवर विविध कमेंट्स करण्यात आल्यात. यापैकी काही कमेंट्स या मजेशीर देखील आहेत.