Monkey Attack : आता पोलिसांना करावा लागतोय माकडांचा पाठलाग; नेमकं काय आहे प्रकरण

अधिकाऱ्यांना या माकडांच्या ़डोळ्यात न पाहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

Updated: Nov 3, 2022, 04:38 PM IST
Monkey Attack : आता पोलिसांना करावा लागतोय माकडांचा पाठलाग; नेमकं काय आहे प्रकरण title=

Japan Monkey Rampages : तुम्ही कधी पोलिसांना (Police) माकडांच्या (Monkey) मागे धावताना पाहिलंय का? नाही ना. पण हे खरंय. जपानमध्ये (Japan) आता पोलिसांना माकडांचा पाठलाग करावा लागणार आहे. जपानमधील लोक माकडांच्या (Monkey) दहशतीमुळे खूप चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत आता माकडांना लगाम घालण्यासाठी जपानचे पोलीस (Japan Police) रस्त्यांवर उतरले आहेत. जंगली माकडांचे हल्ले (Monkey) रोखण्यासाठी 'ट्रँक्विलायझर' गन म्हणजे प्राण्यांना दुखापत न होता बेशुद्ध करणारी बंदुक वापरली जात आहे. जपानच्या (Japan) यामागुची शहरात गेल्या काही आठवड्यांमध्ये माकडांच्या हल्ल्यात मुले आणि वृद्धांसह 42 जण जखमी झाल्याची नोंद आहे. या हल्ल्यांसाठी जपानी माकडांना जबाबदार धरले जात आहे.
 
बीबीसीच्या वृत्तानुसार, जपानमध्ये जंगली माकडांचे हल्ले ही आतापर्यंत एक सामान्य गोष्ट होती. पण आता अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीय आणि लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. जंगली माकडांकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आधी फक्त लहान मुले आणि महिलांवरच हल्ले होत होते. पण माकडांनी वृद्धांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे अनेक वृद्ध नागरिकही जखमी झाले आहेत. 

शहरात माकडांना पकडण्यासाठी लावलेले सापळे निरुपयोगी ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे. सापळ्यात ठेवलेल्या अन्नाकडे माकडे आकर्षित होत नाहीत, हे त्यामागचे कारण आहे. माकडांना अन्नपदार्थात रस नसतो त्यामुळे हे सापळे उपयोगी ठरत नाहीयेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, माकडे खूप हुशार आहेत आणि ती फक्त गुप्तपणे लोकांवर हल्ला करत जखमी करत आहेत.

माकडांवर कारवाई करण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.  जेव्हा माकड तुमच्यावर हल्ला करेल, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाहू नका. तसेच स्वतःला शक्य तितके मोठे दाखवण्याचा प्रयत्न करा. मग कोणतीही अचानक पावले न उचलता शक्य तितक्या शांतपणे मागे जा, असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.