Work Pressure In Twitter: एलोन मस्क यांनी 44 अरब डॉलरमध्ये ट्विटर (Twitter) खरेदी केल्यानंतर आता बदल करण्यात सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी सीईओ पराग अग्रवाल (CEO Parag Agrawal) यांच्यासह मोठ्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. आता ट्विटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे. सध्या ट्विटरमध्ये 7500 कर्मचारी काम करत आहेत. एका रिपोर्टनुसार एलोन मस्क (Elon Musk) जवळपास 3700 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर दबाव निर्माण झाला आहे. नोकरी वाचवण्यासाठी कर्मचारी ऑफीसमध्येच राहात असल्याची चर्चा आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो ट्विटर ऑफिसमधला असल्याचं बोललं जात आहे. हा फोटो शेअर करत एक महिला कर्मचारी ऑफिसमध्येच झोपत असल्याची चर्चा आहे.
एवन नावाच्या ट्विटर युजर्सने हा फोटो ट्वीट केला आहे. वर्क प्रेशरमुळे कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्येच झोपावं लागत आहे. कामासाठी डेडलाईन असल्याने नोकरी जाण्याची भीती सतावत आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी पूर्ण दिवस राहून डेडलाईन पूर्ण करावी लागत आहे. व्हायरल फोटोनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. हा फोटो ट्विटर कर्मचाऱ्याचा आहे की नाही? याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. नुकतंच एलोन मस्क यांनी, कर्मचाऱ्याना आठवड्याचे सात दिवस आणि दिवसाला 12 तास काम करण्याची सूचना दिली होती.
When you need something from your boss at elon twitter pic.twitter.com/hfArXl5NiL
— evan (@evanstnlyjones) November 2, 2022
आश्चर्य! 24 दिवस न खाता पिता झोपून राहिला तरीही होता जिवंत, कसं ते जाणून घ्या
4 एप्रिल 2022 रोजी एलोन मस्क यांनी ट्विटरमध्ये 9 टक्के भागीदारीसह सर्वात मोठे शेअरहोल्डर बनले होते. त्यानंतर 14 एप्रिल 2022 रोजी मस्क यांनी 44 अरब डॉलरची ऑफर दिली. त्यानंतर मस्क आणि ट्विटर यांच्या 44.2 अरब डॉलरचा करार पूर्ण झाला.