स्टॉकहोम : गळा कापलेल्या अवस्थेत महिला पत्रकाराचा मृतदेह मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही महिला पत्रकार स्वीडनची असून, तिचा मृतदेह डेन्मार्कच्या समूद्र किनाऱ्यावर आढळून आला.
एका पानबूडीतून प्रवास करताना या महिला पत्रकाराचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. डेन्मार्क पोलिसांनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालात शवाचा आणि पत्रकार किम वाल हिचा डिएनए जुळला आहे. पोलिसांनी सांगितले की, याबाबतची विस्तृत माहिती लवकरच जाहीर केली जाईल. शवाचे डोके धडापासून जाणीवपूर्वक वेगळे करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
डेन्मार्कच्या समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या खाडीत हे शव सोमवारी आढळून आले. हे ठिकाण कोपनहेगनपासून ५० कीलोमिटर दूर दक्षिणेला आहे. या महिला पत्रकाराने द गार्डिनय आणि द न्यूयॉर्क टाईम्सला काम केले आहे. एका स्टोरीसाठी ती पानबूडीतून प्रवास करत होती. दरम्यान, १० ऑगस्टपासून ती बेपत्ता होती. एका स्टोरीसाठी मुलाखत घेताना तिने आपला जीव धोक्यात घातला होता. पोलीस पुढील तपास करत आहेत.