बिजिंग : आनंदाचा क्षण असतो तेव्हा आपल्याही आनंदाला पारावार उरत नाही. अनेकदा अति उत्साहात आनंदाच्या भरात आपण अशा काही गोष्टी करून जातो ज्यामुळे आपल्यालाच नुकसान होऊ शकतं. कधीकधी अति आनंदाच्या उत्साहात आपल्याकडून जे होणार नाही ते ओढून ताणून करण्याचा प्रयत्न करतो.
एका तरुणाच्या बाबतीत जे घडलं ते फार भयंकर होतं. बर्थडे पार्टीच्या उत्साहात त्याने आपल्या मित्रांसाठी गाणं गायलं. हे गाणं गाताना त्याला फुफ्फुसांमध्ये मोठा त्रास झाला. यामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.
या तरुणाने गाणं गाताना वरचा सूर लावला ज्यामुळे त्याच्या फुफ्फुसात इजा झाल्याची माहिती समोर आल्याचं समजत आहे. याबाबत झी 24 तासने अजून कोणतीही पुष्टी केली नाही. मात्र स्थानिक मीडियाने असा दावा केला आहे.
Oddity Central ने दिलेल्या अहवालानुसार चीनच्या हुनानामध्ये राहणाऱ्या वांग जी मित्रांच्या घरी वाढदिवसांसाठी गेला होता. तिथे पार्टीमध्ये डान्स आणि गाणं होतं. त्याच वेळी मित्रांना खुश करण्यासाठी त्याने गाणं गायलं.
गाण्यामध्ये स्वर उच्च लागल्याने ती वेळ त्याने निभावून नेत गाणं पूर्ण केलं. मात्र तेच त्याच्या जीवावर बेतता बेतता राहिलं. गाण्याच्या नोट जशाच्या तशा सूरात कॉपी करण्याच्या नादात छातीमध्ये जोरात दुखायला सुरुवात झाली.
वांग पार्टी संपवून आपल्या घरी गेला मात्र त्याचं छातीत दुखणं कमी झालं नाही. जेव्हा सहनशक्ती संपली तेव्हा रुग्णालय गाठलं. डॉक्टरांनी एक्स रे केला. तो एक्स रे पाहून डॉक्टरही हैराण झाले.
वांग जी याचे फुफ्फुसं आणि चेस्ट वॉलच्या मध्ये एअर बबल्स दिसले. गाण्याचा सूर क्षमतेपेक्षा जास्त वर लावल्याने एक छोटं छिद्र तयार झालं होतं. त्याला मेडिकल टर्ममध्ये pneumothorax म्हटलं जातं. डॉक्टरांनी तातडीनं त्यावर उपचार केले.
रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या ट्रिटमेंटनंतर वांग जीला बरं वाटलं त्याला डिस्चार्ज देण्यात आला. दुसऱ्याची कॉपी करणं या वांग जीला चांगलंच महागात पडलं आहे. त्यामुळे आपली क्षमता ओळखून त्यावर काम करणं जास्त योग्य आहे. कॉपी करण्यामुळे हानी देखील पोहोचू शकते.