नवी दिल्ली : मेट्रो स्टेशनवर आई आणि मुलगा हरवल्याची घटना घडली आहे. आणि आता ते दोघेही सोशल मीडियावर स्टार बनले आहेत. कारण
आई आणि मुलगा अचानक मेट्रो स्टेशनवर हरवले आणि त्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे ते चर्चेत आले ही गोष्ट थोडी वेगळी आहे. त्याला कारणही तसंच काहीसं आहे. ४० सेकंदाची ही व्हिडिओ क्लिप मेट्रो अथॉरिटीद्वारे जाहिर केली आहे. या क्लिपला आतापर्यंत जवळपास दीड करोड लोकांनी पाहिलं आहे.
डेली मेलने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार हा प्रकार १२ नोव्हेंबर रोजी घडला आहे. तिथे चीनच्या हुबई परिसरातील एका अंडरग्राऊंड स्टेशनवर एक मुलगा आपल्या आईपासून वेगळा झाला असल्याचे समोर आले आहे. मात्र स्टेशन स्टाफच्या मदतीने हा मुलगा ताओजियालिंग स्टेशनवर आपल्या आईला भेटला. आई - मुलाचा हा भावूक क्षण सर्विलांस कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून आईने मुलाला पाहिल्यावर धावत येऊन तिने अगदी त्याला जवळ घेतलं.
या क्लिपला वुहान सब - वे ऑपरेशन द्वारे वीबो अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टनुसार, स्टाफमधील प्रत्येक व्यक्तीने या मुलाला आपल्या आईला भेटण्यासाठी मदत केली. स्लो मोशन इफेक्टमध्ये जारी झालेला हा व्हिडिओमध्ये आई गोडं हसत आपल्या मुलाला जवळ घेताना दिसत आहे.