काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेक प्रांतांमध्ये तालिबानींचं वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. पण पंजशीरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी तालिबानला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंजशीरमधील स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. पंजशीरमध्ये सत्ता स्थापन झाल्याचा दावा तालिबानने केला आहे, तर दुसरीकडे नॉर्दर्न एलायंसने युद्ध अद्यापही सुरू आहे आणि आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याची शपथ घेतली आहे. दरम्यान तालिबानवर सोमवारी रात्री बॉम्ब हल्ला करण्यात आला.
मध्य रात्री झालेल्या या हल्ल्यामुळे तालिबानला मोठं नुकसान झालं आसल्याचं सांगण्यात येत आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा तालिबानच्या ठिकानांवर हल्ले करण्यात आले. हल्ले करणारे लढाऊ विमाने कोणत्या देशाचे होते हे स्पष्ट झालेले नाही. सध्या याप्रकरणी पुढे काय होईल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
طائرات عسكرية مجهولة تستهدف مواقع طالبان في وادي بنجشير وعودة للمواجهات بين المعارضة والحركة
روسيا؟
طاجيكستان ؟— Mohammed Alsulami| محمد السلمي (@mohalsulami) September 6, 2021
पत्रकार मुहम्मद अल्सुल्मानी ट्विट करत म्हणाले की, 'अज्ञात विमानांनी तालिबानवर हल्ला केल्यानंतर पलायन केलं आहे. हे कुणी केलं आहे.... रूस की ताजिकिस्तान’? ' या हल्ल्यामुळे तालिबानला मोठं नुकसान झालं आसल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी तालिबानकडून अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही.
याआधी, पंजशीरवर ताबा मिळवण्याचा दावा करताना त्यांनी म्हटले होते की, अफगाणिस्तानचा शेवटचा गडही त्याच्या ताब्यात आला आहे. त्याचबरोबर नॉर्दर्न एलायंसचे प्रमुख अहमद मसूद यांनी तालिबानींचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तालिबान बऱ्याच काळापासून पंजशीर जिंकण्याचा प्रयत्न करत आहे.