न्यूयॉर्क : अमेरिकेत, कांद्यातील साल्मोनेला बॅक्टेरियाच्या उद्रेकामुळे 37 राज्यांत 650 हून अधिक लोक आजारी पडले आहेत. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने सांगितले की, सध्या सुमारे 129 लोक रुग्णालयात दाखल आहेत आणि पण अजून कोणाचाही मृत्यू झालेला नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हा रोग वाढल्याचे नोंदवले गेले, त्यानंतर टेक्सास आणि ओक्लाहोमामध्ये सर्वाधिक प्रकरणे आढळली आहेत.
आयात केलेल्या कांद्यामुळे पसरला रोग
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (सीडीसी) ने या आठवड्यात सांगितले की, चिहुआहुआ, मेक्सिकोमधून आयात केलेले संपूर्ण लाल, पांढरे आणि पिवळे कांदे उद्रेकाचे कारण आहेत. हे प्रोसॉर्स इंक नावाच्या कंपनीद्वारे संपूर्ण युनायटेड स्टेट्स (यूएस) मध्ये वितरीत केले जाते. कंपनीने आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले की, कांदा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आयात केला गेला. पण कांदे काही महिने घरात साठवले जाऊ शकतात आणि कधीकधी ते व्यावसायिक वापरासाठी देखील वापरले जाऊ शकतात.
स्टिकर्सशिवाय कांदा न खाण्याचा सल्ला
अमेरिकेतील ग्राहकांना सल्ला देण्यात येत आहे की, चिहुआहुआ येथून प्रोसॉर्सद्वारे आयात आणि वितरीत केलेले संपूर्ण ताजे लाल, पांढरे किंवा पिवळे कांदे खरेदी करू नका किंवा खाऊ नका आणि संपूर्ण लाल, पांढरा किंवा पिवळा कांदा फेकून द्या, ज्यात स्टिकर्स नाहीत किंवा पॅकेजिंग नाहीत.
आजाराची लक्षणे
साल्मोनेला संसर्ग हा जीवाणूजन्य रोग आहे जो साल्मोनेला जीवाणूंच्या गटामुळे होतो जो सामान्यतः गॅस्ट्रोनोमिकल रोगांना कारणीभूत ठरतो. या जीवाणूमुळे आजारी पडणाऱ्यांमध्ये अतिसार, ताप आणि पोटात दुखणे अशी लक्षणे दिसतात. त्याची लक्षणे 6 तास ते 6 दिवसांपर्यंत कधीही दिसू शकतात.