डेवाओ (फिलीपीन्स) : फिलीपीनिसच्या दक्षिण डेवाओ येथील एका मॉलमध्ये लागलेल्या आगीत 37 लाकांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये मॉल कर्मचारी आणि कॉल सेंटरमधील कर्माचाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
स्थानीक महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार आणि उप महापौर पाओले दुतेर्ते यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहीलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, आगीत सापडलेल्या 37 लोकांचे प्राण वाचण्याची शक्यता कमी आहे.
पोओलो दुतेर्ते हे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांचे पुत्र आहेत. पोलीस अधिकारी राल्फ कैनोय यांनी सांगितले की, चार मजली 'एनसीसीसी मॉल'मध्ये सकाळी आग भडकली. अनेक लोक मॉलमध्ये अडकले. याच मॉलच्या चौथ्या मजल्यावर एक कॉलसेंटरही आहे. मुळात आग तिसऱ्या मजल्यावर भडकली होती. जिथे फर्निचर आणि कपड्यांचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुले तिसऱ्या मजल्यावरील आगींच्या ज्वाळा चौथ्या मजल्यावर पोहोचल्या. ज्यामुळे या 37 कर्मचाऱ्यांचे प्राण धोक्यात आले.