Mia Khalifa On Hamas Israel Attack : सध्या इस्त्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्या घनघोर युद्धास सुरूवात झाली आहे. इस्त्रायलने हमासचा नायनाट करण्याचा निश्चय केला असून गाझा पट्टी रक्ताने माखल्याचं चित्र समोर येत आहे. देशभरातून या युद्धावर प्रतिक्रिया येत आहे. कोणी इस्त्रायला समर्थन दिलंय. तर अनेकांनी हमासला साथ दिलीये. अशातच पॉर्नस्टार मिया खलिफा (Mia Khalifa) हिने देखील पॅलेस्टाइनला समर्थन दिलंय. त्यामुळे आता मिया खलिफाला मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. मिया खलिफाने पॅलेस्टाइन इस्त्राइल युद्धात पॅलेस्टाइनला सपोर्ट केल्यामुळे तिला नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्याती माहिती समोर आली आहे. मिया खलिफा हिला गेल्या वर्षी रेड लाईट हॉलंड कंपनीत (Red Light Holland) सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.
प्लेबॉयने मिया खलिफाच्या ट्विटरवरील एकामागोमाक एक केलेल्या पोस्टनंतर प्लेबॉयने तिच्यासोबतचे कंत्राट रद्द (Mia khalifa Lost Job) केलं आहे. मियाचे चॅनेलही प्लेबॉयने डिलीट करून टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मिया खलिफाला मोठा धक्का बसल्याचं समोर आलंय. मियाने पॅलेस्टाईनला आपला भक्कम पाठिंबा व्यक्त केला. त्यावेळी तिने नोकरी काढून टाकणाऱ्यांचा समाचार घेतला. सीईओला उत्तर देताना, तिने लगेच त्याला 'झायोनिस्ट' म्हणून लेबल केलं. मला असं म्हणायचंय की, पॅलेस्टाईनला पाठिंबा दिल्यानं माझ्या व्यवसायाच्या मी संधी गमावल्या आहेत, असं मियाने यावेळी म्हटलंय.
तुम्ही पॅलेस्टाइनमधील परिस्थितीकडे पाहत असाल आणि पॅलेस्टाइनच्या बाजूने नसाल तर तुम्ही चुकीच्या बाजूने आहात. सरणारा काळ काही वर्षांमध्ये इतिहासाच्या स्वरुपात याचा प्रत्यय करुन देईल, असं मिया खलिफाने म्हटलं होतं. मिया खलिफा ही यापूर्वीही अनेकदा इस्रायल आणि पॅलेस्टाइन संघर्षाबद्दल उघडपणे बोलली आहे. कोणीतरी त्या पॅलेस्टीनी स्वातंत्र्य सैनिकांना सांगा की मोबाईल फोन उभा धरून व्हिडीओ शूटींग करा, असं म्हणत मियाने आपला पाठिंबा पॅलेस्टाईनला दर्शवला होता. आता तिला त्यामुळे नोकरी गमावावी लागली आहे.
— Red Light Holland (@redlightholland) October 8, 2023
दरम्यान, इस्रायलवर तिहेरी हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे हिजबुल्लाह लेबनॉन सीमेवर आपल्या लढाऊ सैनिकांची जमवाजमव करत आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानात सत्तेवर असलेल्या तालिबानलाही पॅलेस्टाईनच्या मदतीला धावून जाऊ शकतो. त्यामुळे येत्या काळात इस्त्रायलच्या अडचणी वाढू शकतात.