मास्को / कीव : Russia Ukraine War : रशिया युक्रेन यांच्यामधील युद्धात दोन्ही बाजूंनी मोठे दावे प्रतिदावे केले जात आहेत. (Russia Ukraine Conflict) युद्ध आता तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. युक्रेनचे 821 युद्धतळ बेचिराख केल्याचा रशियाचा दावा आहे. तर 14 रशियन विमाने, 8 हेलिकॉप्टर, 102 रणगाडे उडवले असा युक्रेनने दावा केला आहे. एवढंच नाही. तर रशियाचे 300 सैनिक युद्धबंदी केले तर 3500 रशियन सैनिक मारले, असाही दावा युक्रेनने केला आहे.
युक्रेनची राजधानी कीव येथे रशियन सैन्य पोहोचले आहे. त्यांनी शहराचा ताबा घेतला आहे. रशियन सैनिक गस्त घातलातान दिसून येत आहेत. मात्र, काही ठिकाणी नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. एक नागरिक रशिय सैनिकांचा रणगाडा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. युक्रेनचे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. रशियन सैनिकांची शहरात दहशत निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
रशियन फौजांनी राजधानी कीव जिंकण्यासाठी जोरदार हल्ले सुरू केले आहेत. रशियन फौजा राजधानीवर मोठी बॉम्बफेक करत आहेत. मिसाईल्सचाही मारा केला जात आहे. कीव विमानतळाजवळ एका भल्यामोठ्या रहिवासी इमारतीवर रशियाने मिसाईल्सद्वारे हल्ला केला. यात इमारतीचं मोठे नुकसान झाले.
या इमारतीतल्या एका घरातच रशियाचं मिसाईल थेट येऊन आदळलं. इमारत खिळखिळी झाल्यामुळे कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका आहे. रहिवासी इमारत असल्याने इथे मोठी जीवितहानी झाली असण्याची शक्यता आहे.