मुंबई: घरात पोलीस येणार म्हणजे काळजात धस्स होतं. सध्या देशात ड्रग्स प्रकरणावरून अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. एका प्रकरणात पोलिसांनी डॉक्टर महिलेच्या घरावर छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान जो प्रकार घडला ते पाहून पोलीसही अवाक झाले. घरात छापेमारी सुरू होती. कॅमेरे लागले होते. मात्र डॉक्टर महिला शांतपणे काम करत होती.
पोलिसांनी डॉक्टर महिलेला अनेक प्रश्न विचारले मात्र त्यावर एकही उत्तर न देता आपलं काम नियमितपणे करत राहिली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या महिलेनं अखेर पोलिसांनी दिलेल्या कागदांवर सह्या केल्या आणि ते घरातून जाण्याची वाट पाहू लागली.
Обыск в квартире @DrAnastasy
продолжается. Раз нарушила санитарный режим — изъять технику! С ковидом только так и можно бороться.Анастасия отлично играет и на хамство внимания не обращает. Героическая женщина! pic.twitter.com/Xif3BGljkI
— zakharova (@exCheremnova) January 27, 2021
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की डॉक्टर महिला पियानो वाजवत आहे. तिच्या घरत पोलिसांनी छापा टाकला आहे. मात्र तरीदेखील कोणताही ताण न घेता शांतपणे पियानो वाजवण्यात ती दंग झाली आहे. ही घटना रशियामधील असल्याचं सांगितलं जात आहे.
अनस्तासिया वासिलयेवा असं या डॉक्टर महिलेचं नाव आहे. त्यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्यावर कोरोना व्हायरससंदर्भात खोट बोलल्याचा गंभीर आरोप देखील केला होता. त्यामुळे ही डॉक्टर महिला तुफान चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा या व्हिडीओमुळे तिची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.