Alien dead body : आजपर्यंत एलियन असल्याचे अनेक दावे करण्यात आले आहेत. त्यातच आता थेट पहिल्यांदाच जगासमोर आला एलियनच्या मृतदेहाचा व्हिडिओ समोर आला आहे. शास्त्रज्ञांनी प्रथमच दोन कथित एलियनचे मृतदेह सादर केले आहेत. मेक्सिकन संसदेत सादर करण्यात आलेल्या एलियनच्या मृतदेहाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडालेय.
मेक्सिकन संसदेत सादर करण्यात आलेल्या एलियनच्या मृतदेहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. @IndianTechGuide नावाच्या ट्विटर हँडलवरुन हा 26 संकेंदाचा व्हिडिओ शेअक करण्यात आला आहे. या व्हिडिओवर 12 सप्टेंबर 2023 अशी तारीख देखील आहे. पेरू देशातील कुस्को येथे सापडलेल्या एलियनचे हे मृतदेह असल्याची कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलेय. या व्हिडिओमध्ये दोन पेट्यांमध्ये एलियनचे मृतदेह ठेवण्यात आल्याचे दिसत आहे. एलियनचे हे मृतदेह हडारो वर्षे जुने असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Scientists unveiling two alleged alien corpses took place in Mexico, which are retrieved from Cusco, Peru. pic.twitter.com/rjfz9IMf37
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) September 13, 2023
स्पॅनिश न्यूज वेबसाइट marca ने याबाबते वृत्त दिले आहे. मेक्सिको सिटीतील शास्त्रज्ञांनी अधिकृत कार्यक्रमादरम्यान या दोन कथित एलियनचे मृतदेह जगासमोर सादर केले आहेत. मेक्सिकन पत्रकार आणि युफोलॉजिस्ट जेम मौसन यांच्या उपस्थित हे एलियनचे मृतदेह सादर करण्यात आले. मेक्सिकन शास्त्रज्ञांनी हे मृतदेह एलियनचे असल्याचा दावा केला आहे. यावेळी अमेरिकन्स फॉर सेफ एरोस्पेसचे कार्यकारी संचालक आणि यूएस नेव्हीचे माजी पायलट रायन ग्रेव्हज देखील उपस्थित होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये दोन वेगवेगळ्या लाकडी पेट्यांमध्ये दोन मृतदेह दिसत आहे. हे मृतदेह मनुष्याच्या मृतदेहासारखे दिसत आहेत. .
पेरू देशातील कुस्को येथे हे मृतदेह सापडले आहेत. यूएफओच्या ढिगाऱ्यातून हे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र, हे अवशेष आणि पृथ्वीवरील मानव यांच्यात साधर्म्य असले तरी मृतदेह पृथ्वीवरील मानवाचे नसून परग्रहावरील जीवाचे असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या मृतदेहांना ममीप्रमाणे शवपेटीत जतन करुन ठेवण्यात आले आहे. रेडिओकार्बन डेटिंगच्या मदतीने या मृतदेहांच्या डीएनए पुराव्याचे विश्लेषण केले जाणार आहे. यानंतर हे मृतदेह नेमके कुणाचे आहेत. याबाबतचे सत्य जगासमोर येईल.
अमेरिकेच्या सरकारकडे एलियन्स आणि परग्रहावरील इतर जीवांचे मृतदेह असल्याचा दावा काही महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. अमेरिकेचे माजी गुप्तचर अधिकारी डेविड ग्रुश यांनी केलेल्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर अपघातग्रस्त यानातून परग्रहावरील इतर जीवांचे अर्थता एलियनचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. वॉशिंग्नटमध्ये हाऊस ओव्हरनाईट सब कमिटीच्या सुनावणीवेळी डेविड ग्रुश यांनी एलियनबाबत एखबळजनक दावे केले होते.