पेशावर : बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानची बहिण पाकिस्तानातून निवडणूक लढवणार आहे. पाकिस्तानात येत्या २५ जुलै रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. दी एक्स्प्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. नूरजहाँ असं शाहरूखच्या बहिणीचं आहे, पख्तूनख्वा विधानसभा मतदारसंघातून नूरजहाँ अपक्ष निवडणूक लढवणार आहे. नूरजहाँ ही शाहरूखची चुलत बहिण असल्याचं सांगण्यात येत आहे. शाहरूख खानने देखील एका मुलाखतीत आपली पेशावर आणि लाहोर शहरातील बालपणीची आठवण सांगितली होती.
नूरजहाँ जरी शाहरूखची चुलतबहिण असली, तरी शाहरूख आणि नूरजहाँ यांच्यात घनिष्ठ नातेसंबंध आहेत. नूरजहाँ पाकिस्तानातून भारतात आतापर्यंत शाहरूखला भेटण्यासाठी २ वेळेस आलेली आहे. नूरजहाँ ही पाकिस्तानात शाह वाली कटाल या भागात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. नूरजहाँची प्रचार मोहिम तिचा भाऊ हाताळणार आहे, नूरजहाँच्या भावाचं नाव मन्सूर आहे. आपल्याकडे राजकीय वारसा असल्याचा दावा मन्सूरने स्थानिक मीडियाशी बोलताना केला आहे.
शाहरूख खानची बहिण नूरजहाँ निवडणूक लढवण्याविषयी म्हणते, 'मला मतदारसंघातील समस्यांवर लक्ष केंद्रीत करायचे आहे, विशेष म्हणजे मला महिला सशक्तीकरणात काम करायला आवडतं'.
नूरजहाँचा भाऊ मन्सूरने दिलेल्या माहितीनुसार, तिला अपक्ष उमेदवार म्हणून रणांगणात उतरवण्याचा निर्णय घेतला, कारण नूरजहां हिला अवामी नॅशनल पार्टी या पक्षानेही तिकिट देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र ते त्यावर शेवटपर्यंत निर्णय होवू शकला नाही. यानंतर मात्र मन्सूरने तिला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला.
शाहरूख खानने 'झिरो'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. माझे वडील त्या ठिकाणाहून आलेले आहेत, माझ्या परिवारातील काही लोक अजूनही पेशावरमध्ये राहतात. मी १५ वर्षांच्या असताना वडील मला घेऊन गेले होते. माझ्या खूप चांगल्या आठवणी आहेत. मी वडीलांसोबत बालपणी पेशावर, कराची आणि लाहोरमध्ये फिरलो. मी माझ्या मुलांनाही एकेदिवशी तिकडे फिरायला घेऊन जाणार आहे. मी त्यांच्याकडून पाहुणे मंडळीचं किती उत्साहाने आदरतिथ्य करायचं हे शिकलो.