Snake in flight : विमानात प्रवास करत असताना अचानक समोर साप दिसला तर? हे एखाद्या सिनेमात दाखवल गेलं होतं. पण सत्यात देखील उतरेल असं वाटलं नसेल. मलेशियामधून समोर आलेल्या काही छायाचित्रे आणि व्हिडिओंनी सोशल मीडियावर सर्वांनाच हैराण केले आहे. हजारो फूट हवेत उडणाऱ्या विमानात एका सापाने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण केली.
इमर्जन्सी लँडिंग
सापाला पाहताच लोकांनी आरडाओरडा सुरू केला. यानंतर अटेंडंटने प्रवाशांना घाबरून न जाण्याचा सल्ला देत सर्वांना सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन दिले. विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेताना पायलटने वरिष्ठांना कळवले. हे उड्डाण करणार्या कॅप्टनने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमानाचे पुन्हा लँडिंग केले. या घटनेचे अनेक व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. जे आतापर्यंत लाखो वेळा पाहिले गेले आहे.
एअर एशियाचे स्टेटमेंट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमान वळवले जाईपर्यंत साप AirAsia Airbus A320-200 मध्ये राहिला. एअरएशियाचे सेफ्टी ऑफिसर कॅप्टन लिओंग तिएन लिंग म्हणाले, "विमान कंपनीला या प्रकरणाची माहिती मिळाली आहे. क्वालालंपूर ते तवाऊ या विमानात साप दिसल्याची नोंद झाली आहे. ही बाब गंभीर आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू.
Yikes!
Snake on a plane!
Either an escaped pet from passenger carry on/luggage or possibly climbed its way into the aircraft from the ground.Air Asia Airbus A320-200,Kuala Lumpur to Tawau.
This dude happily stayed inside the illuminated area till plane was diverted pic.twitter.com/jqopi3Ofvp— Hana Mohsin Khan | هناء (@girlpilot_) February 12, 2022
प्रकरणाचा तपास सुरू
विमानाच्या आत साप कसा पोहोचला? हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही. त्याला प्रवाशाने सोबत आणले होते की बाहेरून विमानात प्रवेश केला होता? या सर्व प्रश्नांसह प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.