Terminator : हॉलिवूडच्या Terminator या चित्रपटात वेगळाच थ्रील पहायला मिळाला. रेड लाईट एरियावर लक्ष ठेवण्यासाठी एका व्यक्तीने चक्क डोळ्यात कॅमेरा बसवला. एका व्यक्तीने आपल्या खऱ्या खुऱ्या आयुष्यात Terminator सारखा थ्रील केला आहे. एका व्यक्तीने डोळे काढून डोळ्यात कॅमेरा बसवला आहे. कोण आहे हा व्यक्ती, डोळ्यात कॅमेरा बसवल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाले जाणून घेऊया.
डोळे हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. डोळ्यांमुळेच आपण हे जग पाहू शकतो. डोळे हे आपल्या शरीरात कॅमेराप्रमाणे काम करतात. डोळे आपल्या मज्जासंस्थेशी जोडलेला असतात. यामुळेच आपण जवळच्या गोष्टी सहज पाहू शकतो. मात्र, एका व्यक्तीने जगावेगळा प्रयोग केला आहे. या व्यक्तीने आपला खरा डोळा काढून कॅमेरा बसवला आहे. जगावेगळा प्रयोग करणाऱ्या हा व्यक्ती चित्रपट निर्माते रॉब स्पेन्स (Rob Spence) आहे. त्यांच्या या विषेष प्रयोगामुळ ते रिअल लाईफ टर्मिनेटर Terminator तसेच आयबॉर्ग Eyeborg नावाने ओळखले जात आहेत. टर्मिनेटर हा हॉलीवूडचा लोकप्रिय थ्रीलिंग चित्रपट आहे. रॉब स्पेन्स यांनी 2007 मध्ये खरा डोळा काढला. त्या जागी बनावट डोळ्याच्या आत त्यांनी एक कॅमेरा बसवला. या कॅमेऱ्यात बॅटरी, सर्किट बोर्ड आणि कॅमेरा सेन्सर आहे.
रॉब स्पेन्स लहान असताना त्यांचा अपघात झाला होता. गोळीबार करताना चुकीच्या पद्धतीने बंदूक धरली होती. त्यामुळे त्यांना गोळी लागली होती. गोळी लागल्याने त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होता. दरम्यान त्यांचा डोळा निकामी झाला. यानंतर त्यांचा खरा डोळा काढण्यात आला. आणखी एक शस्त्रक्रिया करुन त्यांना एक कृत्रिम डोळा बसविण्यात आला. कृत्रिम डोळ्याच्या ऐवजी कॅमेरा बसवावा अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली. यानंतर त्यांनी कृत्रिम डोळा काढून कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला. रॉब स्पेन्सचे सहकारी असललेले डिझायनर कोस्टा ग्राममॅटिस यांनी त्यांना मदत केली. कोस्टा ग्राममॅटिस यांनी त्यांच्यासाठी एक वायरलेस कॅमेरा डिजाईन केला. कृत्रिम डोळ्याच्या आत हा कॅमेरा बसवता येईल असा सूक्ष्म कॅमेरा त्यांनी तयार केला. इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या मार्टिन नावाच्या त्यांच्या आणखी एका सहकाऱ्याने त्यांना मदत केली. मार्टिन यांनी एक छोटा सर्किट बोर्ड तयार केला. या सर्किटच्या मदतीने वायरलेस कॅमेरा डेटा स्टोर करुन शेअर करु शकतो. लाइव्ह सायन्सच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
या वायरलेस कॅमेरामध्ये मायक्रो ट्रान्समीटर, छोटी बॅटरी, मिनी कॅमेरा आणि मॅग्नेटिक स्विच देण्यात आला आहे. या स्विचच्या मदतीने डोळ्यातील कॅमेरा चालू आणि बंद करता येवू शकतो.
डोळ्यात बसवलेला हा कॅमेरा एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 30 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. हा कॅमेरा ऑप्टिक नर्व्ह सिस्टिमला जोडलेला नसला तरी ते फिल्म मेकिंगसाठी या कॅमेऱ्याचा डेटा वारतात. 2009 मध्ये गिनीज वर्ल्ड ऑफ बुकमध्ये याची नोंद झाली होती.