वॉशिंग्टन : कोरोनाचा प्रसार चीनमधून झाला. तरीही चीन कोरोना विषाणूबाबत माहिती लपवत आहे. विषाणूचा प्रसार होण्यामागची माहिती सांगत नाही. तसेच कोरोनाचा प्रसार रोखायचा कसा याचीही माहिती देत नाही तसेच सहकार्यही करत नाही. त्यामुळे अमेरिकेने चीनला इशाही दिला होता. मात्र, चीनकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आता अमेरिकेने चीनला धडा शिकविण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेच्या नऊ प्रभावशाली सिनेटर्सच्या गटाने संसदेत एक विधेयक आणले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, जर चीन कोरोनाव्हायरस संसर्गाबाबत संपूर्ण माहिती पुरवित नाही आणि ते नियंत्रित करण्यास सहकार्य करत नाही, त्यामुळे त्यांच्यावर प्रतिबंध लादण्याची गरज आहे. यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना चीनवर बंदी घालण्याची परवानगी देण्यात यावी.
अमेरिकेत आत्तापर्यंत कोरोनाने ८० हजार बळी गेले असून १३ लाख ४७ हजार जणांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत मोठी चिंता व्यक्त होत आहे. कोरोनाचा आटोक्यात आणण्यासाठी चीनकडून अमेरिकेने सहकार्य करण्याची मागणी केली होती. तरीही चीनकडून काहीही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे अमेरिका अधिक संतप्त झाली आहे. 'कोविड -१९ अधिनियम विधेयक' सिनेट सदस्य लिंडसे ग्राहम यांनी तयार केले आहे. याला अन्य आठ खासदारांनी समर्थन करत पाठिंबा दिला आहे. हे विधेयक मंगळवारी सिनेटमध्ये सादर करण्यात आले.
या विधेयकात असे म्हटले आहे की, राष्ट्रपती ६० दिवसांच्या आत हा प्रस्ताव प्रमाणित करतील. चीन, युनायटेड स्टेट्स, त्याच्या सहयोगी संस्था किंवा यूएन-संलग्न संस्था कोविड -१९ संदर्भात तपासासाठी संपूर्ण माहिती करुन घेतली आहे. आणि मांसाहारी वस्तूंची विक्री करणारी सर्व बाजारपेठा चीनने बंद केली होती, ज्यामुळे प्राण्यांपासून मानवांमध्ये कोणताही संसर्ग होऊ शकलेला नाही.
या विधेयकात म्हटले, जर राष्ट्रपतींनी हे प्रमाणित केले नाही तर त्यांना चिनी मालमत्ता सील करणे, प्रवासावरील निर्बंध लादणे, व्हिसा रद्द करणे, अमेरिकन वित्तीय संस्थांना चीनी व्यवसायांना कर्ज देण्यापासून रोखणे आणि अमेरिकन शेअर बाजारावर चिनी कंपन्यांची यादी करुन त्यांना रोखण्यात यावे तसेच बंदी घालण्यासारख्या निर्बंध लादणे योग्य ठरेल.
ग्राहम म्हणाले, "मला खात्री आहे की चीनी कम्युनिस्ट पक्षाने गोष्टी लपविल्या नसत्या तर विषाणू अमेरिकेत पोहोचलाच नसता. ते म्हणाले, "चीनने आंतरराष्ट्रीय समुदायाला परीक्षणासाठी वुहान प्रयोगशाळेला भेट देण्यास नकार दिला." मला असे वाटते की, जर चीनवर दबाव आणला गेला नाही तर ते या तपासणीत कधीही सहकार्य करणार नाही.
वुहान येथून कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यापासून जगात २ लाख ५० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४० लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. या विषाणूचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे, जेथे ८० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे आणि १४ दशलक्ष लोकांना याचा संसर्ग झाला आहे.