सगळ्यात महागडी नंबर प्लेट, ज्यावर लिहिला जातोय Sexual शब्द, त्याची किंमत ऐकून बसेल धक्का

Sexual शब्द नंबर प्लेटवर लिहणे हा काय प्रकार आहे? अशा नंबर्स प्लेटची किंमत किती, तुम्हाला माहितीय का?  

Updated: Jul 26, 2022, 05:49 PM IST
सगळ्यात महागडी नंबर प्लेट, ज्यावर लिहिला जातोय Sexual शब्द, त्याची किंमत ऐकून बसेल धक्का title=

मुंबई : कार किंवा बाईकवर व्हीआयपी नंबर प्लेट लावण्याचा अनेकांना का शौक असतो.यासाठी ते कितीही पैसे द्यायला मालक तयार असतात. युकेमध्ये तर सेक्शुअल शब्दांच्याही नंबर प्लेटस बनवून मिळतात. या नंबर प्लेट नेमक्या असतात कशा आणि या प्लेटची किंमत किती असते ते जाणून घेऊयात. 

यूकेमध्ये अशा सेक्शुअल शब्दांच्याही नंबर प्लेटस बनवल्या जातात. regtransfers.co.uk या ऑनलाइन वेबसाइटवर या नंबर प्लेटस विकल्या जातात अशी माहिती आहे.  

यूकेमध्ये (ORG 45M) ही एक नंबर प्लेट  1.4 कोटी रुपयांना विकली जात आहे. काही लोकांच्या मते, ही नंबर प्लेट ORG 45M ला 'ऑर्गझम' असेही वाचता येते. त्यामुळेच या नंबर प्लेटची किंमत एवढी वाढली आहे. अशा नंबर प्लेटसना सेक्शुअल नंबर प्लेट म्हणतात. 

(ORG 45M) ही नंबर प्लेट 1995 मध्ये  48 लाख रुपयांना विकली गेली होती. त्यानंतर केंट (यूके) येथे राहणाऱ्या ६१ वर्षीय अॅलन बर्कने ते विकत घेतले. अॅलनने आपल्या कारमध्ये ही नंबर प्लेट लावली होती, परंतु त्याच्या पत्नीने या कारमध्ये त्याच्यासोबत प्रवास करण्यास नकार दिला होता. 

दरम्याम ही नंबर प्लेट यूकेमध्ये regtransfers.co.uk या ऑनलाइन वेबसाइटवर पुन्हा एकदा विकली जाणार आहे. वेबसाइटशी संबंधित अँजेला बहन म्हणाल्या, हा नंबर अनेकांना आकर्षित करत आहे. हे महाग आहे परंतु बहुतेकांपेक्षा वेगळे आहे.

सर्वात महाग नंबर प्लेट
यूकेमध्ये आतापर्यंतची सर्वात महागडी नंबर प्लेट 4,80 दशलक्ष रुपयांना विकली गेली. या व्यक्तीने फेरारी 250 साठी '25 0' नंबर प्लेट घेतली होती.'मिरर'च्या रिपोर्टनुसार, जर आपण नंबर प्लेटच्या जागतिक विक्रमी किंमतीबद्दल बोललो तर ते सौदीच्या एका व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी गाडीच्या नंबर प्लेटवर '1' लिहिले होते. ज्याला 95.95 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

दरम्यान असे अनेक शौकिन आहेत ज्यांना अशाप्रकारच्या नंबर प्लेटसं गाडीवर लावण्याचा शौक आहे. त्याच्यासाठी अशा नंबर प्लेट बनवल्या जातात.