बापरे ! 25 व्या वर्षी महिलेची तब्बल 22 मुले तरी हवीत आणखी 83 मुले, पाहा कसं काय झालं शक्य?

महिलेला अजून 83 मुलांना जन्म देण्याची इच्छा... या महिलेची कहाणी वाचून धक्का बसेल.

पोपट पिटेकर | Updated: Oct 2, 2022, 12:03 AM IST
बापरे ! 25 व्या वर्षी महिलेची तब्बल 22 मुले तरी हवीत आणखी 83 मुले, पाहा कसं काय झालं शक्य? title=

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी 2 चाइल्ड पॉलिसी म्हणजेच फक्त दोन मुलांचे धोरण विचारात घेतले जात आहे. महागाईच्या युगात आता कोणालाही 2 पेक्षा जास्त मुले जन्माला घालायची इच्छा नसेल. लोक आता लहान कुटुंबाच्या जीवनशैलीला उत्तम मानतात.

लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढल्यानं त्याचा सर्व संसाधनांवर अतिरिक्त ताण येतो. देशाच्या प्रगतीवर, विकासावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणामही होतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन देशातील सरकारे लोकसंख्या नियंत्रणाचा निर्णय घेतात. त्याच वेळी, एक महिला या प्रवृत्तीच्या विरोधात चालली आहे. या महिलेची मुलांबद्दल इच्छा ऐकून तुम्हाला जबर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. काय आहे महिलेची इच्छा वाचाच..

25 व्या वर्षी तब्बल 22 मुलं

महिलेला वयाच्या 25 व्या वर्षी तब्बल 22 मुलांची आई आहे. महिलेचे नाव क्रिस्टीना ओझटर्क ( Kristina Ozturk ) आहे. तिचा नवरा अब्जाधीश आहे. तिची इच्छा आहे की तिला अजून 83 मुले जन्माला घालायची आहेत. घरात 22 मुलं असल्यामुळे त्याचं घर हे बालगृह असल्या सारखं वाटतं. ज्या लोकांना ही माहिती मिळाली ते देखील हैरान झालेत.

105 मुलांची आई होण्याची इच्छा

महिला क्रिस्टिनाचे वय 2014 मध्ये 17 वर्षे होते. जेव्हा तिने मुलीला जन्म दिला. त्या मुलीला पाहून या जोडप्याने 100 हून अधिक मुले जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. मात्र, हे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी सरोगसीची मदत घेतली.

एका मुलासाठी तब्बल 8 लाख खर्च

क्रिस्टीना ओझटर्क आणि तिच्या पतीने सरोगसीसाठी कंपन्या भाड्याने घेतल्या. ते महिलांचे गर्भ भाड्याने घेतात आणि शुक्राणू आणि अंडी फलित करतात. या प्रक्रियेतून या जोडप्याने तब्बल 21 मुलांना जन्म दिला आहे. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी या जोडप्याला सरोगसीच्या माध्यमातून आणखी 83 मुले जन्माला घालायची आहेत. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो एका मुलासाठी सुमारे 8 लाख रुपये खर्च करतो.

अशी घेते मुलांची काळजी

महिलेचा संपूर्ण दिवस मुलांना संभाळण्यात जातो. क्रिस्टीना ही दिवसभर मुलांची खूप काळजी घेते. मुलांनी भरपूर खावे, खेळावे आणि रात्री वेळेवर झोपावे असा तिचा प्रयत्न असतो. इतक्या मुलांची काळजी घेतांना तिला त्रास ही होतो. पण त्यात आनंद असल्याचं क्रिस्टीना सांगते.