नवी दिल्ली : देशातील सर्वात स्वस्त शहर कोणतं? असं तुम्हाला कुणी विचारलं तर... या प्रश्नाचं उत्तर 'इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट'नं (ईआययू) आपल्या एका अहवालात दिलंय.
जगभरात 'कॉस्ट ऑफ लिव्हिंग २०१८'च्या सर्वेक्षणानुसार, दक्षिण आशियाई देश खासकरून भारत आणि पाकिस्तानातील शहर अधिक स्वस्त आहेत. सर्वात स्वस्त शहरांच्या यादीत टॉप १० शहरांमध्ये भारतातील बंगळुरू, चेन्नई तसंच नवी दिल्ली या शहरांचा समावेश आहे.
या अहवालानुसार, भारताचा वेगानं आर्थिक विस्तार होण्याची शक्यता आहे परंतु, प्रति व्यक्तीच्या हिशोबानं मात्र वेतन आणि खर्चात मात्र कमतरता राहील. असमान वेतनामुळे हा परिणाम वर्तवला जातोय.
जगातील सर्वात स्वस्त शहरामध्ये सीरियाची राजधानी दमिश्कचा प्रथम क्रमांक लागतोय. त्यानंतर वेनेझुएलाची राजधानी काराकास तसंच कझाकिस्तानचं व्यापार केंद्र असलेलं अल्माटी या शहरांचा क्रमांक लागतो.
तर, सिंगापूर सलग पाचव्या वर्षी जगातील सर्वात महागडं शहर ठरलंय. दुसऱ्या क्रमाकांवर पॅरिस, तिसऱ्या क्रमांकावर ज्युरिक तसंच चौथ्या क्रमांकावर हाँगकाँग आहे.
वर्ल्डवाईड कॉस्ट ऑफ लिव्हिंग एक द्विवार्षिक इकोनॉमिक इंटेलिजन्स युनिट सर्व्हे आहे. यामध्ये १६० उत्पादन आणि सेवांच्या किंमतींची तुलना केली जाते. यामध्ये खाद्यपदार्थ, पेय, कपडे, घरगुती सामान, घर भाडं, दळण-वळणाचा खर्च, युटिलिटी बिल, खाजगी शाळा, घरकामाला मदत अशा अनेक किंमतींचा समावेश आहे.
दमिश्क
कराकास
अल्माटी
लागोस
बंगळुरू
कराची
अल्जिअर्स
चेन्नई
बुखारेस्ट
नवी दिल्ली
सिंगापूर
पॅरिस
ज्युरिक
हाँगकाँग
ओस्लो
जेनेवा
सियोल
कोपेनहेगेन
तेल अवीव
सिडनी