मुंबई: आयआयटी आणि एनआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल आज (रविवार, १० जून) जाहीर झाला. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. तुम्ही स्वत: किंवा तुमच्या माहितीतल्या विद्यार्थ्याने ही परीक्षा दिली असेल आणि त्याचा निकाल तुम्हाला पहायचा असेल तर, तुम्ही तो तत्काळ पाहू शकता. त्यासाठी पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा.
आयआयटी आणि एनआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरातून १,५५,१५८ बसले होते. त्यापैकी १८ हजार १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, या परीक्षेत ३६० पैकी ३३७ गुण मिळवत हरयाणातील पंचकुला येथील प्रणव गोयल देशभरातून पहिला आला. तर, ऋषी अग्रवाल हा राज्यातून पहिला आला आहे. दरम्यान, साहिल जैन, कलश शहा हे विद्यार्थ्यी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मुलींमध्ये कोटा येथील मीनल पारेख हिने ३६० पैकी ३१८ गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. एकूण निकालात ती देशातून सहावी आहे. या परीक्षेत एकूण १६०६२ विद्यार्थी आणि २०७६ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या. तर, सर्वसाधारण गटातील ८७९४, ओबीसी प्रवर्गातून ३१४०, अनुसूचित जातींमधून ४७०९ आणि अनुसूचित जमातींमधून १४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले