लंडन : बॉस म्हटलं की प्रत्येकाच्या कपाळावर हलकीशी आठी येते. पण सगळेच बॉस वाईट असतात असे नाही. अनेकदा त्यांच्या प्रतिक्रिया, बोलणे हे परिस्थितीवर आणि मूडवर अवलंबून असते. त्यातील मूड हा भाग अतिशय महत्त्वाचा.
तुमच्याही बॉसचा मूड सारखा बदलत असतो का ? एका क्षणी खूश आणि दूसऱ्या क्षणी नाराज? असा असतो का? त्यामुळे बॉसशी नक्की कसे बोलावे किंवा वागावे, यात तुमचा गोंधळ उडतो का? मग या बॉसच्या मूडबद्दल थोडे जाणून घेऊया...
एका अभ्यासातून असे दिसून आले की, प्रत्येक वेळी वाईट मूड असणाऱ्या बॉसच्या तुलनेत सातत्याने मूड बदलणाऱ्या बॉसमुळे कर्मचारी अधिक त्रासले जातात. भारतात आणि ब्रिटेनमध्ये झालेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. बॉस कर्मचाऱ्यांनी कशाप्रकारे वागतो, याचा परिणाम निश्चितच कर्मचाऱ्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर होतो.
ब्रिटेनमधील एक्सटर विश्वविद्यालयातील संशोधकांनी सांगितले की, एका क्षणी छान बोलणाऱ्या आणि दूसऱ्या क्षणी रागावणाऱ्या बॉस अधिक हानिकारक असतो. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, एखाद्या व्यक्तीचे बॉसशी असलेले नाते वाईट असेल तर ते तसेच राहीले. बदलले नाही, तर ते ठीक आहे.
एक्सटर विश्वविद्यालय के एलन ली ने सांगितले की, ''जर तुमचा बॉस आनंदी आणि चिडचिडा दोन्ही असेल तर तो तुमच्याबद्दल काय विचार करतो, हे समजणे काहीसे कठीण आहे. त्यामुळे बॉसवर विश्वास करणे देखील शक्य होत नाही. यामुळे तुमच्यातही एक प्रकारची नकारात्मकता येते.''