नितीन गडकरी

नितीन गडकरी

नितीन गडकरीभारतीय जनता पक्ष

भाजपमधील एक महत्त्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जन्म २७ मे १९५७ ला झाला. उद्योजक ते राजकीय नेते असा त्यांचा हा प्रवास आहे. भारतीय जनता पक्षाचे ते माजी राष्ट्रीय अध्यक्ष देखील होते. नागपूर लोकसभा मतदार संघातून २,८४,८६८ मतांच्या फरकाने ते लोकसभेवर निवडून आले आहेत. गडकरींना ५,८७,७६७ मते मिळाली होती. सध्या मोदी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. याआधी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात १९९५-१९९९ दरम्यान युतीचे सरकार काळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते आणि किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.

२००९ मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. या पदावर जाणारे ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची धाडसी नेतृत्व म्हणून देखील वेगळी ओळख आहे. भारतात पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. संपूर्ण देशात त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. देशात आज मोठ्या गतीने महामार्गांची निर्मिती होत आहे आणि याचं श्रेय नितीन गडकरींना जातं. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ स्थापन करून रस्ते निर्मितीसाठी खुल्या बाजारातून निधी उभारण्याची किमया त्यांनी करून दाखवली होती. हा प्रयोग भारतात पहिल्यांदाच करण्यात आला होता. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पक्षाने देखील त्यांचं आवडते खातं त्यांना दिलं. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. महामार्ग, जलमार्ग आणि गंगा नदीवरचे प्रकल्प या सर्व कामात त्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून मोठी कामे केली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मोदींवर टीका होत असताना नितीन गडकरींना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची मागणी होत होती.

आणखी बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणात परतणार का? नितीन गडकरींनी अखेर केलं स्पष्ट, म्हणाले, 'सक्षम...'

महाराष्ट्राच्या राजकारणात परतणार का? नितीन गडकरींनी अखेर केलं स्पष्ट, म्हणाले, 'सक्षम...'

Nitin Gadkari Interview: केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील (Nitin Gadkari) सध्या विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) निमित्ताने राज्यातील प्रचारात व्यग्र आहेत. दरम्यान झी 24 तासच्या

Nov 14, 2024, 14:43 PM IST
 नितीन गडकरींवर विरोधक टीका का करत नाहीत? स्वतःच दिलं उत्तर; म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी...

नितीन गडकरींवर विरोधक टीका का करत नाहीत? स्वतःच दिलं उत्तर; म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी...

Nitin Gadkari: नितीन गडकरी यांनी टू द पॉइंट कार्यक्रमात अनेक प्रश्नांची बेधडक उत्तरे दिली आहे. विरोधक गडकरींवर टीका का करत नाहीत, यावर त्यांनी उत्तर दिलं आहे. 

Nov 14, 2024, 12:49 PM IST
पीएम मोदी 8, गडकरी 40, योगींच्या 15 रॅली, महाराष्ट्रात भाजपाचे दिग्गज प्रचारात उतरणार

पीएम मोदी 8, गडकरी 40, योगींच्या 15 रॅली, महाराष्ट्रात भाजपाचे दिग्गज प्रचारात उतरणार

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी 7,995 उमेदवार मैदानात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी स्टार प्रचारक मैदानात उतरणार आहेत. भाजपकडून

Oct 30, 2024, 17:46 PM IST
Nitin Gadkari's claim that the grand coalition government will come after the elections

निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार येणार, नितीन गडकरी यांचा दावा

Nitin Gadkari's claim that the grand coalition government will come after the elections

Oct 06, 2024, 18:40 PM IST
Nitin Gadkari And Sharad Pawar To Share Stage In Sangli Maratha Event

आज पवार-गडकरी एकाच मंचावर, मराठा समाज संस्थेच्या कार्यक्रमात एकत्र

आज पवार-गडकरी एकाच मंचावर, मराठा समाज संस्थेच्या कार्यक्रमात एकत्र

Oct 04, 2024, 15:25 PM IST
रस्त्यावर थुंकणाऱ्यांचं करायचं काय? गडकरींनी सांगितला जालीम उपाय; म्हणाले, 'त्यांचे..'

रस्त्यावर थुंकणाऱ्यांचं करायचं काय? गडकरींनी सांगितला जालीम उपाय; म्हणाले, 'त्यांचे..'

Nitin Gadkari On Pan Masala Spitters: नागपूरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रीय मंत्री असलेल्या गडकरींनी रस्त्यावर पान मसाला खाऊन थुंकणाऱ्याबद्दल भाष्य केलं.

Oct 03, 2024, 12:27 PM IST
सबसिडीच्या भरवशावर राहू नका, सरकार म्हणजे विषकन्या- नितीन गडकरी

सबसिडीच्या भरवशावर राहू नका, सरकार म्हणजे विषकन्या- नितीन गडकरी

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं सरकारविषयी मोठं वक्तव्य. सरसकट गडकरी असं का म्हणाले? पाहा सविस्तर वृत्त   

Sep 30, 2024, 12:27 PM IST
पुणे विमानतळाचं नाव बदलणार! फडणवीसांची घोषणा; गडकरी म्हणाले, 'आम्ही पंतप्रधांनाकडून..'

पुणे विमानतळाचं नाव बदलणार! फडणवीसांची घोषणा; गडकरी म्हणाले, 'आम्ही पंतप्रधांनाकडून..'

Pune Airport Will Be Renamed: देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये ही घोषणा केल्यानंतर गडकरींनी आम्ही हा ठराव पंतप्रधानांकडून मंजूर करुन घेऊच असं म्हटलं आहे.

Sep 21, 2024, 13:45 PM IST
'...तेव्हा सारं काही एका मिनिटात सरळ होईल'; नितीन गडकरींचं मतदारांना जाहीर आवाहन

'...तेव्हा सारं काही एका मिनिटात सरळ होईल'; नितीन गडकरींचं मतदारांना जाहीर आवाहन

Nitin Gadkari Speech In Nagpur: नागपुरमधील श्री विश्वव्याख्यानमाला कार्यक्रमामध्ये बोलताना नितीन गडकरींनी सर्व मतदारांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. त्यांनी घराणेशाहीवर बोलताना हे आवाहन केलं.

Sep 21, 2024, 12:05 PM IST