नितीन गडकरी

नितीन गडकरी

नितीन गडकरीभारतीय जनता पक्ष

भाजपमधील एक महत्त्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जन्म २७ मे १९५७ ला झाला. उद्योजक ते राजकीय नेते असा त्यांचा हा प्रवास आहे. भारतीय जनता पक्षाचे ते माजी राष्ट्रीय अध्यक्ष देखील होते. नागपूर लोकसभा मतदार संघातून २,८४,८६८ मतांच्या फरकाने ते लोकसभेवर निवडून आले आहेत. गडकरींना ५,८७,७६७ मते मिळाली होती. सध्या मोदी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. याआधी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात १९९५-१९९९ दरम्यान युतीचे सरकार काळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते आणि किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.

२००९ मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. या पदावर जाणारे ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची धाडसी नेतृत्व म्हणून देखील वेगळी ओळख आहे. भारतात पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. संपूर्ण देशात त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. देशात आज मोठ्या गतीने महामार्गांची निर्मिती होत आहे आणि याचं श्रेय नितीन गडकरींना जातं. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ स्थापन करून रस्ते निर्मितीसाठी खुल्या बाजारातून निधी उभारण्याची किमया त्यांनी करून दाखवली होती. हा प्रयोग भारतात पहिल्यांदाच करण्यात आला होता. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पक्षाने देखील त्यांचं आवडते खातं त्यांना दिलं. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. महामार्ग, जलमार्ग आणि गंगा नदीवरचे प्रकल्प या सर्व कामात त्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून मोठी कामे केली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मोदींवर टीका होत असताना नितीन गडकरींना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची मागणी होत होती.

आणखी बातम्या

Nagpur Ground Report Nitin Gadkari Lok Samwad Yatra For Lok Sabha Election

नागपूरमध्ये गडकरींकडून प्रचाराचा धडाका

Nagpur Ground Report Nitin Gadkari Lok Samwad Yatra For Lok Sabha Election

Mar 30, 2024, 14:35 PM IST
Loksabha Election 2024: गडकरींविरुद्ध नागपूरमधून तब्बल 25 उमेदवार? काही तासांत स्पष्ट होणार चित्र

Loksabha Election 2024: गडकरींविरुद्ध नागपूरमधून तब्बल 25 उमेदवार? काही तासांत स्पष्ट होणार चित्र

Loksabha Election 2024 Nitin Gadkari Nagpur Constituency: केंद्रीय मंत्री असलेल्या नितीन गडकरींनी तिसऱ्यांदा खासदारकीसाठी उभे असून त्यांनी 27 मार्च रोजी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला

Mar 30, 2024, 10:42 AM IST
टोल प्लाझा- फास्टॅगची कटकट मिटणार; टोलवसुलीसाठीच्या नव्या सिस्टिमबद्दल सांगत गडकरी म्हणाले...

टोल प्लाझा- फास्टॅगची कटकट मिटणार; टोलवसुलीसाठीच्या नव्या सिस्टिमबद्दल सांगत गडकरी म्हणाले...

Satellite-Based Toll System: नितीन गडकरी यांनी अलीकडेच एक घोषणा केली आहे. त्यानुसार, लवकरच टोल प्रणालीमध्ये बदल होणार आहे. 

Mar 28, 2024, 11:55 AM IST
नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या विकास ठाकरेंची संपत्ती किती?; 5 वर्षात काँग्रेस उमेदवाराचा जोरादार 'विकास'!

नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या विकास ठाकरेंची संपत्ती किती?; 5 वर्षात काँग्रेस उमेदवाराचा जोरादार 'विकास'!

Loksabha Election 2024 : खासदार नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या आमदार विकास ठाकरेंची संपत्तीचा आकडा ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. संपत्ती साडेचार वर्षात 63 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा

Mar 28, 2024, 07:51 AM IST
करोडोंच्या घरात आहे नितीन गडकरींचे वार्षिक उत्पन्न; किती आहे नेटवर्थ? वाचा

करोडोंच्या घरात आहे नितीन गडकरींचे वार्षिक उत्पन्न; किती आहे नेटवर्थ? वाचा

Nitin Gadkari Net Worth: नितीन गडकरी हे नागपुरातून लोकसभा निवडणुक लढवत आहेत. आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. जाणून घेऊयात त्यांची नेटवर्थ किती आहे. 

Mar 27, 2024, 14:16 PM IST
Loksabha Election 2024 : विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी! नितीन गडकरीसह रश्मी बर्वे भरणार अर्ज

Loksabha Election 2024 : विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी! नितीन गडकरीसह रश्मी बर्वे भरणार अर्ज

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नितीन गडकरी, रश्मी बर्वे आणि राजू पारवे हे दिग्गज निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. 

Mar 27, 2024, 09:06 AM IST
Video: नितीन गडकरींनी शेअर केल्या हटके Recipes; 5 मिनिटात होणारा ठेचा अन् वांग्याचे काप एकदा ट्राय कराच

Video: नितीन गडकरींनी शेअर केल्या हटके Recipes; 5 मिनिटात होणारा ठेचा अन् वांग्याचे काप एकदा ट्राय कराच

Nitin Gadkari Share Recipes Watch Video: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या कामाबरोबरच खवय्येगिरीसाठी ओळखले जातात. वेगवेगळ्या पदार्थांबद्दल बोलायला आणि गप्पा मारायला गडकरींना फार आवडतं हे

Mar 26, 2024, 11:24 AM IST
नितिन गडकरींचा राजकीय वारसदार कोण? स्पष्टच सांगितलं 'माझा एकही मुलगा...'

नितिन गडकरींचा राजकीय वारसदार कोण? स्पष्टच सांगितलं 'माझा एकही मुलगा...'

Political heir of Nitin Gadkari : राजकारणातील हेवीवेट नेता असलेल्या नितिन गडकरींचा राजकीय वारसदार कोण? यावर खुद्द नितिन गडकरींनी नागपुरात (Nagpur Contituency) प्रचारादरम्यान उत्तर दिलंय.

Mar 24, 2024, 16:58 PM IST
Nagpur Nitin Gadkari Vs  Vikas Thackeray

नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे?

नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे?

Mar 19, 2024, 20:40 PM IST
Nagpur LokSabha : नितीन गडकरींची हॅटट्रिक रोखणार कोण? काँग्रेससाठी कोण ठरणार गेमचेंजर?

Nagpur LokSabha : नितीन गडकरींची हॅटट्रिक रोखणार कोण? काँग्रेससाठी कोण ठरणार गेमचेंजर?

Nagpur Loksabha constituency : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातून भाजपनं पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना (Nitin Gadkari) उमेदवारी दिलीय. तर दुसरीकडं काँग्रेसचा उमेदवार अजून ठरलेला नाही

Mar 18, 2024, 23:35 PM IST
मुंबई-पुण्यापर्यंत ई-बस धावणार; गडकरींनी सांगितला पुढच्या 5 वर्षांचा प्लान

मुंबई-पुण्यापर्यंत ई-बस धावणार; गडकरींनी सांगितला पुढच्या 5 वर्षांचा प्लान

Nitin Gadkari On Electric vehicles: येत्या पाच वर्षात देशात ई-बसची संख्या वाढेल व लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही ईबस धावेल, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. 

Mar 18, 2024, 18:11 PM IST
भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 11 राज्यातील 74 नावांची घोषणा... वाचा एका क्लिकवर

भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 11 राज्यातील 74 नावांची घोषणा... वाचा एका क्लिकवर

Loksabha 2024 BJP List : लोकसभा निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या दुसऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 11 राज्यातील 74 नावांची घोषणा करण्यात आली असून यात

Mar 13, 2024, 19:40 PM IST
'हे बालिश आणि हास्यास्पद', गडकरींनी उद्धव ठाकरेंची ऑफर नाकारली; संजय राऊत म्हणाले 'दिल्लीत तुमचा अपमान...'

'हे बालिश आणि हास्यास्पद', गडकरींनी उद्धव ठाकरेंची ऑफर नाकारली; संजय राऊत म्हणाले 'दिल्लीत तुमचा अपमान...'

उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा भाजपाला सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीत प्रवेश कऱण्याची ऑफर दिली आहे. नितीन गडकरी यांनी ही ऑफर नाकारली असून हे बालिश आणि हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे.   

Mar 13, 2024, 11:10 AM IST