Loksabha Election 2024 : विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहिला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षातील उमेदवार आपला अर्ज दाखल करणार आहे. नागपूरमध्ये भाजपचे स्टार प्रचारक नितीन गडकरी अर्ज दाखल करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी जाताना भाजपकडून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असणार आहे. (Loksabha Election 2024 Last day for filing applications for first phase candidates nitin gadkari Rashmi Barve)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामटेकचे शिवसेनेचे लोकसभा उमेदवार राजू पारवे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती असतील. यासोबतच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी राज्यमंत्री श्रीमती सुलेखाताई कुंभारे हे देखील उपस्थित राहतील. जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यापूर्वी नितीन गडकरी संविधान चौकात सकाळी 9.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बख्त बुलंद शहा चौकात चौकात गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होतील.
रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. सकाळी 11 वाजता बिशप कॉटन हायस्कूलमधील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र येत असून तिथून रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत त्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान जात प्रमाणपत्र पडताळणी चौकशी वरून रश्मी बर्वे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. दरम्यान राजू पारवे हे रामटेक लोकसभा मतदारसंघातून करणार नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. तर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून सुनील मेंढे तर काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार प्रशांत पडोळे करणार नामांकन अर्ज दाखल