मुंबई : पुलवामामध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 भारतीय सीआरपीएफ जवान शहीद झाले. शहीद जवानंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी दोशाच्या कानाकोपऱ्यातून हात पुढे सरसावत आहेत. बॉलिवूड मंडळींनी सुद्धा मदतीचा हात पुढे केला. अभिनेता अजय देवगन, अनिल कपूर, अभिनेत्री माधुरी दीक्षित स्टारर 'टोटल धमाल' सिनेमाच्या संपूर्ण टीमने जवानांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची मदत केली. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी केलेल्या एका ट्विटमधून ही माहिती समोर आली आहे.
Team #TotalDhamaal - the entire crew, actors and makers - donate ₹ 50 lakhs to families of soldiers who were martyred in the #Pulwama terror attack. #PulwamaAttack #PulwamaTerrorAttacks
— taran adarsh (@taran_adarsh) February 18, 2019
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन, सलमान खान अणि उरी सिनेमाच्या टीमने शहीदांच्या कुटुंबाला मदत केली आहे. बच्चनयांनी शहीद झालेल्या जवानांना 5 लाखांची मदत करण्याचे जाहिर केले आहे.
इंद्र कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'धमाल' सीरिजचा 'टोटल धमाल' हा तिसरा सिनेमा आहे. 'टोटल धमाल' सिनेमात अजय देवगन, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा, आणि पीतोबाश हे कलाकार सिनेमात झळकणार आहे. सिनेमात कोबरा, वन्यप्रणी त्याचप्रमाणे वाघ सुद्धा दिसणार आहे.
सिनेमात चाहत्यांना 50 कोटी रुपयांचा गडबड घेटाळा अनुभवता येणार आहे. आणि 50 कोटी रुपयांच्या मागे सगळे पळताना दिसणार आहेत. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित गुजराती कपल म्हणून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. 'टोटल धमाल' सिनेमा 22 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.