'जय मल्हार' फेम अभिनेता देवदत्त नागेचा अपघात; फोटो समोर

 देवदत्त नागे जीव माझा गुंतला या मालिकेत नाकारात्मक भूमिकेत दिसत आहे.

Updated: Dec 19, 2022, 11:21 PM IST
'जय मल्हार' फेम अभिनेता देवदत्त नागेचा अपघात; फोटो समोर title=

मुंबई : झी मराठीवरील 'जय मल्हार' मालिकेतून प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळवलेला अभिनेता देवदत्त नागे सध्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आपल्या अभिनयाने देवदत्त नागे यांनी छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील प्रेक्षकांच मनोरंजन केलं आहे. आता देवदत्त नागे जीव माझा गुंतला या मालिकेत नाकारात्मक भूमिकेत दिसत आहे.

या मालिकेत देवदत्त तुषार देसाई असे नकारात्मक पात्र साकारत आहे. पात्र अंतर आणि मल्हार यांच्या आयुष्यात अडथळे निर्माण करण्याचे काम करत आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून देवदत्त नागेने पुन्हा टीव्ही मालिकांमध्ये पदार्पण केलं आहे.  हे  मालिकेतील बिझी शेड्युलमधून देवदत्तने अचानक ब्रेक घेतल्याचे सोशल मीडियावर जाहीर केलं आहे. 

हे फोटो शेअर करत त्यानं लिहिलं की, 'आता काही दिवसांसाठी आराम. 'जीव माझा गुंतला' मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान छोटी दुखापत झाली. देवाचे आभार की थोडक्यात डोळा वाचला.' देवदत्तच्या डोळ्याच्या खालच्या बाजूला त्याला लागल्याचं दिसत आहे. देवदत्तच्या या पोस्टमुळे आता काही दिवस तरी तो चित्रीकरण करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

देवदत्तच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झालं तर देवदत्तनं स्टार प्रवाहवरील 'देवयानी' मालिकेतून पदार्पण केलं. त्यानं साकारलेली भैया साहेब ही भूमिका खूप गाजली. त्यानंतर झी मराठीवरील 'जय मल्हार' ही प्राइम टाइम मालिका त्याला मिळाली. मालिकेतील देवदत्तनं साकारलेला खंडोबा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर देवदत्तनं 'तान्हाजी' सिनेमा बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर आता 'आदिपुरूष' या सिनेमात तो दिसणार आहे. आदिपुरूष 2023मध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

देवदत्त गजानन नागेने 'वीर शिवाजी', , 'बाजीराव मस्तानी' यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. तो महाराष्ट्रातील अलिबागचा रहिवासी आहे. सध्या पत्नी कांचन नागेसोबत तो मुंबईत राहत आहे. त्याचं वय 41 वर्षे आहे. देवदत्तने हिंदीतून 'वीर शिवाजी' या मालिकेतून टीव्हीमध्ये पदार्पण केलं. त्यात त्यांने 'तानाजी मालुसरे' ही व्यक्तिरेखा साकारली होती. याशिवाय तो 'लागी तुझसे लगन'मध्येही दिसला होता.